मुंबई : भारतीय परंपरा आणि संस्कृतीबाबत कुतूहल असणाऱ्या, हिंदू देवदेवतांची पूजा अर्जा करणाऱ्या अनेकांनाच आपण भारताबाहेरही पाहिलं असेल. परदेशी असणाऱ्या भारतीयांसोबतच मुळचे परदेशी नागरीकही असं काही करताना दिसतात. यातच आचा एका लोकप्रिय परदेशी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मनी हाइस्ट' (Money Heist) या वेब सीरिजमधील अभिनेत्री एस्टर एसेबो (Esther Acebo) असं तिचं नाव. 


सोशल मीडियावर सध्या एस्टर एसेबो (Esther Acebo) च्या घरातील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्या घरातील भींतीवर गणपतीचं चित्र रेखाटलेलं दिसत आहे. 


भींतीवर रेखाटलेली ही मंगलमूर्ती पाहून अनेकांनाच आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटत आहे. 


एस्टर एसेबो हिनं नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या 'मनी हाईस्ट' या सीरिजमध्ये 'मॉनिका' हे पात्र साकारलं होतं. 


पाश्चात्य संस्कृतीत लहानाची मोठी झालेली अभिनेत्री जेव्हा गणपती बाप्पाच्या प्रेमापोटी त्याचं चित्र घराच्या भिंतीवर रेखाटते ते पाहून अनेकांनाच कुतूहल वाटतं. 



व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये अभिनेत्री कॉफी घेताना दिसत आहे. यामध्ये तिचा लूक हा अतिशय सुरेख असल्याचं दिसून येत आहे. 


जिम आऊटफिटमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आणि तिच्या चेहऱ्यावर असणारी चमक चाहते आणि नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे.