मुंबई : तौत्के चक्रीवादळामुळे पावसाचं वातावरण झालं आहे. अनेक शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. असं असताना कोरोना आणि उष्णतेचा विचार बाजूला करत रोमँटिक पावसाच वातावरण झालं आहे. पावसाचं वातावरण होताच निसर्गात एक प्रेमाचं वातावरण पाहायला मिळतं. म्हणूनच पावसाळा या ऋतुला रोमँटिक असं नाव दिलं आहे. 1974 साली सिनेमा अजनबीमधील 'भीगी भीगी रातों में' हे गाणं राजेश खन्ना आणि जीनत अमान यांच्यावर चित्रित केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काळ कोणताही असू दे? पावसाचा प्रभाव हा हिंदी सिनेसृष्टीवर कायम राहिला आहे. सिनेमात पावसाचं वातावरण आणि त्यावर चित्रित केलेल्या गाण्यांचा एक वेगळाच आनंद आहे. 'नमक हलाल' सिनेमात 'आज रपट जाए' हे गाणं अतिशय हिट ठरलं. हे गाणं अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रित केलं आहे. 



पावसाची गाणी तर अजरामर आहेतच... अगदी पावसाच्या पहिल्या थेंबापासून या गाण्यांना चांगलीच पसंती मिळते. बॉलिवूडमधील प्रत्येक दिग्गज कलाकारावर पावसाचं गाणं चित्रित केलं आहे. 'गुरू' सिनेमात ऐश्वर्या रायवर 'बरसो रे मेघा' हे गाणं चित्रित केलं आहे. 



सुपरहिट सिनेमा 'सरफरोश'मध्ये पावसावर एक गाणं आहे. सोनाली बेंद्रे आणि आमिर खानवर हे गाणं चित्रित झालं आहे. या गाण्यात अतिशय रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला आहे. 


मोहरा सिनेमात 'टिप टिप बरसा पानी' मध्ये अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा हॉटनेस पाहायला मिळाला आहे. या गाण्याला पावसात भरपूर पसंती असते.