ASTRO member Moonbin passed away : प्रसिद्ध कोरियन पॉप स्टार आणि के-पॉप (K Pop) बँड अ‍ॅस्ट्रोचा गायक मूनबिन (Astro Moonbin) याने वयाच्या 25 व्या वर्षी निरोप घेतला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मूनबिन त्याच्या सियोलमधील गंगनम-गु येथील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. मूनबिनच्या निधनाचे वृत्त समोर येताच त्याच्या जगभरातल्या चाहत्यांना धक्का बसला आहे. योनहॅप न्यूज टीव्हीच्या वृत्तानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मूनबिनने आत्महत्या केली आहे आणि मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन करण्याचा विचार केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोल गंगनम पोलिसांच्या म्हणण्यानुसार मूनबिनच्या व्यवस्थापकाने सांगितले की त्याच्या घरी रात्री 8:10 वाजता तो मृतावस्थेत आढळला होता. काही वेळातच व्यवस्थापकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. "आम्ही सध्या मूनबिनच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यावर चर्चा करत आहोत. पण मूनबिनने स्वतःचा जीव घेतल्यासारखे दिसते आहे, असे पोलिसांनी सांगितले.




बॉय बँड अ‍ॅस्ट्रोमध्ये सामील होण्यापूर्वी मूनबिन हा एक अभिनेता आणि मॉडेल होता. त्याने मूनबिन आणि सान्हा नावाच्या एका ग्रुपसोबत परफॉरम केले होते. अॅस्ट्रोसमध्ये सामील होण्यापूर्वी तो अप्रेंटिस प्रोग्राममध्ये सहभागी झाला होता. या ग्रुपमध्ये मुळात सहा कलाकार होते, पण एक सदस्य फेब्रुवारी 2023 मध्ये निघून गेला होता.


"ज्यांनी मूनबिनला पाठिंबा आणि प्रेम दिले अशा चाहत्यांना ही अचानक बातमी देणे अधिक वेदनादायक आहे. आम्ही खूपच दु:खी आहोत कारण आम्हाला मूनबिनचा स्वभाव माहिती होता. त्याने इतर कोणापेक्षाही नेहमी त्याच्या चाहत्यांवर प्रेम केले आणि त्यांची काळजी घेतली. आम्ही तुम्हाला खोट्या बातम्यांपासून दूर राहण्याची विनंती करत आहोत जेणेकरुन अचानक आलेल्या दुःखद बातमीने दुःखी झालेल्या शोकग्रस्त मूनबिनच्या कुटुंबाला शोक व्यक्त करता येईल," असे मूनबिनच्या व्यवस्थापकाने म्हटले आहे. दरम्यान, अॅस्ट्रो ग्रुपचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअर्स असून इंस्टाग्रामवर 5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.