किंकाळ्या, थरथराट आणि...; Netflix वरील `हे` चित्रपट, Horror Series एकट्यात पाहूच नका
Most Horrible Series and Movies on Netflix : मी काय भूत वगैरे मानत नाही बरं. ते तसं काही नसतंच मुळी... एखादा भयपट पाहिल्यानंतर असं म्हणणाऱ्या अनेकांचेच धाबे दणाणतात. तुमच्या ओळखीत आहे का कोणी?
Most Horrible Series and Movies on Netflix : एखादी सहल असो, कॅम्पिंग असो किंवा मग मित्रमंडळींसोबत केलेला नाईट आऊट असो. प्रत्येक वेळी रात्रं झाली, काळोख आणखी गडद होत गेला की एकच गोष्ट लक्षात आणली जाते. जणू काही ही एक अलिखित परंपराच आहे. ही गोष्ट म्हणजे Horror Stories ची. 'ए चला ना, भूताच्या गोष्टी सांगुया', असं कोणतरी उत्साहात म्हणतं आणि तिथं असणाऱ्यांपैकी कोणाच्यातरी पोटात भीटीपोटी गोळा येतो.
काही मंडळींना या गोष्टी अगदी उत्तमपणे रंगवून सांगता येतात. तुम्हीही त्यापैकीच एक आहात की, भीतीपोटी चादरीत गुडूप होणाऱ्यांपैकी? तुमचं उत्तर काहीही असो, यावेळी नेटफ्लिक्सवरील काही खास भयपट नक्कीच पाहा कारण, इथं कलाकारंनी भीतीच अनोख्या रुपात मांडली आहे. दर्देजार भयपट पाहणाऱ्यांसाठी तर हे चित्रपट आणि सीरिज तर परवणी आहेत. कारण, त्यातून निर्माण होणारी भीती नकळतच आपल्यालाही धडकी भरवत आहे.
हेसुद्धा पाहा : मसाल्याची ठकसेबाज फोडणी पडेल महागात , पाहा अती तिखट खाण्याचे गंभीर परिणाम
The Conjuring : जेम्स वानच्या दिग्दर्शनात सारालेला हा चित्रपट भारतातही प्रचंड गाजला. जगातील सर्वात भयावह चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणती केली जाते. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या भयपटांमध्येही या चित्रपटाचा समावेश होतो.
Cabinet Of Curiosities: 8 लहान लहान कथा असणाऱ्या या सीरिजनंतर तुमची झोपच उडेल. केट मिसूकी , एंड्रयू लिंकन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या कलाकृतीनं अनेकांची वाहवा मिळवली आहे.
Fear Street: भीती, तीसुद्धा एका वेगळ्या पद्धतीनं सादर करण्याची किमया या चित्रपटातील कलाकारांनी केली आहे. विज्ञान आणि समजुतींचा मेळ इथं साधला गेला आहे.
Bulbul: तृप्ती डिमरी आणि पाओली दाम यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं कथानच अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवणारं ठरलं. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाला कमाल व्ह्यूज मिळाले.
All of us are Dead: झॉम्बी आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकांची आवड असल्यास हा चित्रपट तुमच्यासाठी पर्वणी असेल. एका शाळेत विषाणूचा संसर्ग होतो आणि तेथील विद्यार्थीच झॉम्बी होतात असं काहीसं चित्रपटाचं कथानक. चित्रपटातून दाखवण्यात आलेली भीती पाहून तुम्हीही दचकाल.
काय मग? आता तर तुमच्यासमोर भयपटांची यादीच आहे. चला मग, माहोल करा आणि अनुभवा भयपटांची दुनिया...