मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल सध्या सतत चर्चेत असतात. ९ डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली. त्याचबरोबर आता दोघं लवकरच नव्या घरात प्रवेश करणार आहेत. विकॅटच्या या नव्या घरात त्यांचं संपूर्ण कुटुंब या खास प्रसंगी सामील झालं आहे. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये विकी कौशलचे वडील शाम कौशल आणि त्यांची पत्नी दिसत आहेत. कॅट आणि विकी दोघंही अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे शेजारी बनणार आहेत. याचा खुलासा खुद्द अनुष्कानेच केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय विशेष आहे या फ्लॅटमध्ये 
कतरिना कैफ आणि विकीच्या या नवीन घरात 4 खोल्या आहेत आणि प्रत्येक खोली इंटेरिअर डिझायनर्सच्या मदतीने डिझाइन केली गेली आहे. डिझायनर बेडरूमसोबत किचन आणि फर्निचरचीही डिझाईन केलं आहे. यापूर्वी कतरिना वांद्रे येथे राहायची.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


किती आहे या फ्लॅटचं भाडे 
5 हजार स्क्वेअर फूटमध्ये असलेल्या या घराची किंमत महिन्याला 9 लाख रुपये आहे. हा काही सामान्य फ्लॅट नाही. हे एक सीफेस अपार्टमेंट आहे. जिथे सगळ्या प्रकारच्या लक्झरी सुविधा दिल्या जातील. या फ्लॅटच्या गॅलरीमध्ये एक खाजगी स्विमिंग पूल देखील देण्यात आला आहे. हे अपार्टमेंट मुंबईमधील जुहूमध्ये आहे.