पोपट पिटेकर, प्रोडक्शन एक्झिक्टीव्ह, झी 24 तास मुंबई : गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत हा आजच्या घडीला जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी विद्यार्थ्यांना आज उपलब्ध होत आहेत. 


अनेक विद्यार्थ्यांना या चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते, परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बहुतांश जण खूप धडपडत आपले मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे सुरुवातीला या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणा-या मूलभूत गोष्टीं त्यानां माहिती नसतात. पण काही गोष्टी माहीती नसल्यातरी एखाद्या स्त्रीने ठरवलं तर काहीही करु शकते हे मात्र अहमदगर जिल्हयातील शेवगांव तालुक्यात राहणा-या शुभांगी साळवे या महिलेनं सिद्द केल आहे.


अनेक क्षेत्रांत महिलांचा वावर सहज आणि आत्मविश्‍वासपूर्ण झाला आहे. आकाशाला कवेत घेणारी क्षेत्रे स्त्री शक्ती पादाक्रांत करू पाहत आहे. हे सहज घडलेले नाही. स्त्रियांचे समाजातील स्थान उंचावणे, तिची प्रतिष्ठा वाढविण्यासाठीचे प्रयत्न अगदी आडगावापासून महानगरांपर्यंत होत आहेत. स्त्री प्रतिष्ठा उंचावण्यासाठी आणि तिच्या कर्तृत्वाला भरारी देण्यासाठी भरीव योगदान देणा-या अशा महिला शहरीपेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळतात.



बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:ला फक्त पदवीधर होता आले. याची खंत उराशी बाळगत, अविरत कष्ट करून परिस्थितीशी सतत झगडत, तिन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्यासाठी एका मातेची चालू असलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. शुभांगी साळवे यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. आता त्या अहमदनगर जिल्हयातील शेवगाव तालुक्यात राहतात. त्या फॅशन डिझायनर आणि ब्युटीशियन आहेत. त्यांना तीन मुली आहेत. त्यामधील दोन मुली जुळ्या आहेत त्या नववीत शिकत आहेत. एक मुलगा आहे. काही दिवसापूर्वी नव-याचा  अपघात झाला आणि सुरळीत चालंल जीवन कोणत्या दिशेने चाललय हे मात्र कळेनास झालं. मुलींनी शिकावे, उच्चशिक्षित व्हावे, अशी शुभांगी उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरू आहे.  तीनही मुली हुशार असल्याचा शुभांगी यांना अभिमान आहे.


 


अभिनय क्षेत्रात काम करण्याची आवड..


 पण मुलींना ज्या गोष्टी करायचं आहे. त्या गोष्टीसाठी शुभांगी खूपच मेहनत करताना दिसते. अर्पिता या मुलीला लहानपणापासूनच गाण्याची आणि डान्स करण्याची आवड होती.  तिने शाळेमध्ये ब-याच ठिकाणी डान्स केला .वक्वृत्व स्पर्धेत पण तीने आपली छाप दाखवली आहे. न्यू आर्टस कॉलेज शेवगावं मध्ये अॅक्टीग कार्यशाळेत तिला कॉलेजकडून प्रमाणपत्र देऊऩ गौरविण्यात देखील आले आहे. अर्पिताची आवड पाहून आई शुभांगी आणि वडील रावसाहेब साळवे यांनी तीला आवडेल त्या क्षेत्रात काम करण्याची मुभा दिली. अर्पिताने ठरवल की आपल्याला चित्रपट क्षेत्रात काम करायच आहे. मग सुरु झालं चित्रपट क्षेत्रातील प्रवास...



ऑडिशन भटकंती... 


अर्पिताची आवड पाहून सिरीयल आणि चित्रपटच्या ऑडीशन करता ब-याच ठिकाणी शुभांगी फिरली. पण प्रत्येक ठिकाणी काहीना काही कारणामुळे सिलेक्शन व्हायचं नाही. खुप मेहनती नतंर एका मराठी चित्रपटासाठी निवड झालं. घरचे खूप खूश झाले.पंरतु काही दिवसानी डायरेक्टरनं तुमच्या मुलीला एक्ट्रेस करतो काही पैसे द्यावे लागतील असे सागिंतलं. पैसेची रक्कम खूप असल्याने आणि ते पैसे शुभांगी यांच्याकडे नसल्याने मराठी चित्रपटात काम करण्याची एवढ्या दिवसांनी आलेली संधी देखील अर्पिताची हुकली.


चित्रपटात काम करायच तर थोडीफार का होईना स्व:ताची ओळख आणि पैसा लागतो या गोष्टी साळवे कुटुंबाच्या लक्षात आले. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे नाही आता करायच काय ? हा मोठा प्रश्न शुभांगीच्या डोक्यात पडला.पण तीने जिद्द हारली नाही. आधीही ती घरकाम करत करत छोट्या मोठ्या कविता करत असे. पण आपल्या मुलीला मोठ करण्यासाठी आपणंच काही तरी करायला पाहिजे हे तिच्या लक्षात आल. मग स्वतःच्या मुली करता गाणं लिहियांच ठरवल. आणि मग तिने काही दिवसांनी घरी बसल्याबसल्या ‘नादावला जीव’  हे गाणं लिहिलं. 


नेटवरून घेतली माहिती...


गाण्यांत आपल्या मुलीला अभिनय करायला मिळेल. म्हणून ते गाण्यांच शुटीगं करायचं ठरवलं. पण शुटींग क्षेत्रातल काहीच माहिती नव्हतं. मग आता करायचं काय? हा मोठा प्रश्न शुभांगीच्या डोक्यात पडला. गाणं शूट करायचं म्हटलं की लोकेशन साउंड, ध्वनी पुनध्र्वनिमुद्रण, रि-रेकॉर्डिग, संगीत आणि पार्श्वसंगीत, संगीत , मिक्सिग, संकलन ,सिनेमॅटोग्राफी, या सर्व गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी शुभांगीने नेटचा वापर केला. नेट वर बसून सर्व माहिती व्यवस्थितरीत्या जमा केली.काही स्टूडिओचा नंबर मिळवला.आणि गाणं रेकॉर्डिग करायचं ठरवलं. 


डान्ससाठी १३० किलोमीटर रोज प्रवास 


 राहूरी,पुणे,नगर अशा अऩेक ठिकाणी फिरुन गाण्यांच्या शुटींगसाठी स्टूडिओ पाहिले. ब-याच  ठिकाणी फिरल्यानंतर नगरमध्ये गाण्यांच शुटींग करण्याच ठरवल. गेल्या 30 ते 40 दिवस शुभांगी आणि अर्पिता शेवगाव ते नगर असा प्रवास करुन  सगळ्या गोष्टी समजून घेऊऩ काम करत होते. गाण्यांच्या शुटींगसाठी अर्पिताला डान्स येण आवश्यक आहे हे कळल्यावर शेवगाव ते नगर असा रोज 130 किलो मीटरचा प्रवास करुन नगरमध्ये अर्पिता डान्स शिकत असे. ब-याच गोष्टी इकडूनतिकडून जळवून आणल्या. आणि गेल्या सहा सात महिन्यापासून ज्या गोष्टीसाठी धडपड करत होते त्या मेहनतीच चीज शेवटी झालं. 3 दिवसातं गाण्यांच शुटींग नगरमध्ये झालं. जी गोष्ट ठरवली होती ती अथक प्रयत्नानंतर साध्य झालं. साळवे कुटुंबाने जे स्वप्न पाहिलं होत ते पुर्ण झालं. नगर मधील राज पॅलेस हॉटेल मध्ये ‘नादावला जीव’ हे गाणं मोठ्या जल्लोषात लाँच करण्यात आलं.


 सबकुछ 'नगरी'...


‘नादावला जीव’ या गाण्यांतील सर्व कलाकार आणि इतर  टीम नगरमधीलचं आहे. मनिषा भिंगारदिवे,जितेद्र भिंगारदिवे यानी शुभांगी यांना वेळोवेळी हे गाणं तयार करण्यासाठी खूप मदत केली आहे. सिनेमॅटोग्राफी आणि संकलन अमोल भिंगारदिवे, गायक अविनाश, गीत शुभांगी साळवे, संगीत सारंग देशपाडे आणि w.joseph , नृत्यदिग्दर्शक व्हीक्टर माऊली, यांनी केलं आहे. 


युट्यूबवर ‘नादावला जीव’ हे गाणं अक्षरशाह संगीत प्रेमीनी डोक्यावर घेतल आहे. ग्रामीण भागातील शुभांगी या महिलेन आपल्या मुलीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. तुम्हीही ग्रामीण भागातील या ध्येयवेड्या माऊलीला बळ देण्यासाठी नक्कीच तिने लिहिलेल आणि तिच्या मुलीन अॅक्टीग केलेल गाणं नक्कीच पहा. आणि या ध्येयवेड्या कुटूंबाला बळ द्या...