मुंबई : उत्तराखंडच्या शेतकऱ्याच्या आयुष्यावर साकारण्यात आलेला 'मोती बाग' हा लघुचित्रपट ऑस्करच्या यादीत सामील झाला आहे. या लघुचित्रपटाला ऑस्करमध्ये मानांकन मिळालं आहे. उत्तराखंडमधील मातीचा सुगंध आता अमेरिका नंतर संपूर्ण जगात पसरणार आहे. ऑस्कर फिल्म फेस्टीवलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन लॉस एंजलिसमध्ये होणार आहे. उत्तराखंडच्या सांगुडा गावातील ८३ वर्षीय शेतकऱ्याच्या आयुष्यावर हा चित्रपट रेखाटलेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यादत्त शर्मा यांच्या आयुष्यावर हा लघुचित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मल चंद्र डंडरियाल यांनी केले. लघुचित्रपटात पर्यावरण, जल संरक्षण, रोजगार, शेतकऱ्यांची दुर्दशा इत्यादी रोजच्या जीवनात भेडसावऱ्या गोष्टींवर चित्रण करण्यात आले आहे. 



त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत सोशल मीडियाच्या माध्यमातून लघुचित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'ही खुप आनंदाची गोष्ट आहे की गावातील शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारलेल्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी मानांकन मिळालं आहे. त्याचप्रमाणे मी चित्रपटाचे दिग्दर्शक निर्मल चंद्र डंडरियाल यांना देखील शुभेच्छा. ' ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.