मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार कायमचे एकमेकांचे झाले आहेत. मल्याळी आणि बंगाली रितीरिवाजानुसार लग्न करून दोघांनी सात जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 जानेवारीला दोघांनी गोव्यात लग्न केले. लग्नानंतर नवविवाहित जोडपे पहिल्यांदाच मुंबईला परतले तेव्हा तिथे नवविवाहित जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर दिसत होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेत्रीचा गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गृहप्रवेश विधीसाठी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. सूरज आणि मौनी यांचे मुंबईतील त्यांच्या घरी भव्य स्वागत करण्यात आले. हे पाहून मौनी रॉयचे डोळे भरून आले. सर्वांचे प्रेम पाहून ती स्वतःला रोखू शकली नाही आणि रडू लागली.



गृहप्रवेशचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  मौनी आणि सूरजची ही स्टाईल सर्वांनाच आवडली आहे. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडत आहे.