मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चत असतात. अशाचं अभिनेत्री पैकी एक म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय. मौनी रॉयचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं. 27 जानेवारी रोजी विवाह सोहळा गोव्यामध्ये संपन्न झाला. अभिनेत्रीने बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाह केला आहे. सूरज नांबियार साऊथ इंडियन तर मौनी रॉय बंगाली आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला आहे. लग्नानंतर मौनी अधिक हॉट आणि बोल्ड दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर अनेकदा मौनीने पती सुरजसोबत फोटो पोस्ट केले. आता देखील मौनीने पताीसोबत एक खासगी फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 



पतीसोबत फोटो पोस्ट करत मौनीने कॅप्शनमध्ये, 'फार कमी कालावधी लोटला आहे, तरीही मला तुझी आठवण येत आहे...' असं लिहिलं आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


मौनी रॉय (Mouni Roy) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 'गोल्ड' सिनेमातून मोठ्या पडद्यावर आलेल्या मौनीने छोट्या पडद्यावर देखील कमालीची कामगिरी केली. 



मौनी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मौनी कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.