मुंबई : छोट्या पडद्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आणि आपल्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना घायाळ करणारी मौनी रॉय सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली. मौनीने आपल्या अभिनयाने आधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, आता ती आपल्या स्टाईलने लोकांना इम्प्रेस करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मौनी तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करतेय. मौनी आता तिच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती गुलाबी चमकदार साडी परिधान केलेली दिसत आहे.



तिचा लुक पूर्ण करण्यासाठी मौनीने हलका मेकअप केला आहे. येथे तिने आपले केस खुले ठेवले आहेत. मौनीने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एकापेक्षा एक सिझलिंग पोज देताना दिसत आहे. मौनीच्या या अवताराने लोकांनाही आश्चर्यचकित केले आहे. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसत आहे.



या फोटोमध्ये मौनी पारंपारिक लूकमध्ये ग्लॅमरस रंग भरताना दिसत आहे. या पोस्टवर अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत. चाहत्यांसोबतच सर्व यूजर्स मौनीच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. मौनीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.