मुंबई : मौनी रॉयला सोशल मीडियाची क्वीन म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मौनी तिच्या सुंदर फोटोंने सोशल मीडियावर आग लावत असते. पुन्हा एकदा मौनीने तिच्या चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये मौनी खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौनीचं फोटोशूट
टीव्ही सिरीयलमध्ये नागिन भूमिका साकारणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिने एकता कपूरच्या मालिकेत नागिनची भूमिका साकारली, ज्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. यासोबतच मौनी रॉय दररोज सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यासोबत मौनी रॉय दररोज सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती तिच्या हॉटनेस आणि आवडत्या स्टाईलसाठी चाहत्यांमध्ये विशेष ओळखली जाते. या क्रमाने मौनीने नुकतंच तिचे लेटेस्ट फोटोशूट केलं आहे, जे प्रचंड व्हायरल होत आहे.


मौनी रॉयची स्टाईल
मौनी रॉयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ट्यूब टॉप घातला आहे .याचबरोबर तिने ती काळ्या लांब स्कर्टसोबत कॉम्बिनेशन केलं आहे. या फोटोंमध्ये मौनीची फिगर अप्रतिम दिसत आहे. या लूकवर अभिनेत्रीने आपले केस मोकळे ठेवले आहेत. तिने तिच्या डोळ्यांना स्मोकी लूक दिला आहे याचबरोबर एकदम हलका मेकअपही तिने केला आहे. अभिनेत्रीची ही स्टाईल बरीच किलर दिसतेय.



मौनीचं वर्कफ्रंट
मौनी रॉयचं नवीन गाणं 'बैठे बैठे' नुकतंच रिलीज झालं आहे. त्याचबरोबर याआधी ती 'पतली कमारिया' या गाण्यात दिसला होती. आता ती तिचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. यापूर्वी मौनी 'लंडन कॉन्फिडेंशियल' या वेब सीरिजमध्येही दिसली आहे. ज्यात तिच्या कामगिरी चांगलीच पसंती मिळाली होती.