मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमादरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला एक प्रश्व विचारण्यात आला. ज्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेटकऱ्यांनी तर, सोनाक्षीला असं काही धारेवर धरलं आणि तिच्याविषयी इतके मीम्स व्हायरल केले की, अखेरीस खुद्द सोनाक्षीलासुद्धा यावर व्यक्त व्हावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रामायणानुसार हनुमान कोणासाठी संजीवनी घेऊन गेले होते?', असा प्रश्न तिच्यापुढे उपस्थित करण्यात आला. याच प्रश्नाचं उत्तर देताना समोर असणाऱ्या पर्यायांपैकी सोनाक्षीने सीता, या पर्यायाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. शेवटी तिने लाईफलाइनची मदत घेतली. हा सारा प्रकार अनेकांसाठी अमपेक्षित होता. परिणामी नेटकऱ्यांनी या बी- टाऊन अभिनेत्रीला तिच्या या विसरभोळेपणावरुन चांगलच निशाण्यावर आणलं.


आपली मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात असल्याचं पाहून सरतेशेवटी सोनाक्षीने एक उपरोधिक ट्विट केलं. आपले विसरभोळेपणाचे दाखले देत तिने नेटकऱ्यांना याविषयीचे मीम्सही बनवण्याल सांगितलं. 



'माझ्या प्रिय सजग खिल्ली उडवणाऱ्यांनो, मला पायथागोरसचं प्रमेय, मर्चंट ऑफ व्हेनिस, पीरीऑडिक टेबल, मुघल प्रशासकांविषयी आणि इतरही काही गोष्टींविषयी आठवत नाही आहे. मुळात मला काय आठवत नाही हेत आठवत नाही आहे. तुमच्याकडे काहीच काम नसेल, तर यावही मीम्स तयार करा. मला मीम्स फारच आवडतात....', असं सोनाक्षीने या ट्विटमध्ये लिहिलं. आपण, एखादी गोष्ट विसरुच शकतो, याची इतकी चर्चा केलं जाण्याचं कारणच नसल्याचा सूर तिच्या ट्विटमधून आळवला गेल्याचं पाहायला मिळालं.