`या` चित्रपटात राज ठाकरेंची मुख्य भूमिका, कधी पाहिलंय काय त्यांचं हे रुप?
राज ठाकरे यांनी प्रेक्षकांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवलं आहे
मुंबई : राज ठाकरे, हे नाव घेतलं की धारदार शब्दफेक असणारी भाषणं, विरोधकांवर सडकून केली जाणारी टीका आणि एक अद्वितीय व्यंगचित्रकार अशा काही संकल्पना समोर उभ्या राहातात. (raj thackeray)
मुळात हीच राज ठाकरे यांची ओळख सांगणारी गणितं. एक पक्षप्रमुख असण्यासोबतच राज ठाकरे एक कलाप्रेमीही आहेत.
चित्रकला असो किंवा मग चित्रपट, राज ठाकरे यांनी कायमच त्यांच्यात दडलेला हा खास माणूस क्वचित प्रसंगी सर्वांसमोर आणला आहे.
तुम्हाला माहितीये का, एका चित्रपटासाठीही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मुख्य म्हणजे तुम्हीही हा चित्रपट पाहिला आहे.
आता तुम्ही म्हणाल, असा कोणता चित्रपट ज्यामध्ये राज ठाकरे आम्हाला दिसले नाहीत?
तर, राज ठाकरे कोणाला दिसले नाहीत. पण, त्यांचा आवाज मात्र सर्वांनीच ऐकला. आठवतोय का हा चित्रपट?
2006 मध्ये प्रदर्शित झालेला, केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे 'जत्रा'
'ही कहाणी आहे दोन गावांची, ह्यालागाड आणि त्यालागाड, महाराष्ट्रातल्या असंख्य गावांसारखीच ही दोन गावं...', असं म्हणत एक धीरगंभीर आवाज कानांवर पडतो.
हा आवाज कुठेतरी ऐकलाय... असंच म्हणत आपणही त्या व्यक्तीचं नाव आठवतो.... आणि मग पुढे जाऊन लक्षात येतं की हा आवाज इतर कोणाचा नसून खुद्द राज ठाकरे यांचाच आहे.
चित्रपटाची कथा सांगताना सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी प्रेक्षकांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवलं आहे.
मुळात एका राजकीय नेत्याची ही अशी बाजू समोर येणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक परवणीच.
केदार शिंदे आणि सहकलाकारांनी जिथं या चित्रपटामध्ये मोलाचं योगदान दिलं, तिथेच राज ठाकरे यांचंही योगदान महत्त्वपूर्ण ठरलं.
काय मग, पुढच्या वेळी 'जत्रा' पाहाल तेव्हा, टहा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय, काय बरं त्या व्यक्तीचं नाव? असा प्रश्न नाही ना पडणार?