Mugha Vaishayampan Prathamesh Laghate : सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या लग्नाची. काही दिवसांपुर्वी त्यांनी सोशल मीडियावरून आपलं लग्न ठरलं असल्याचे सांगितले. ''आमचं ठरलंय'' अशी घोषणा त्या दोघांनी दिली. त्यानंतर त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांच्या मनात नानाविध प्रश्नही आले. सध्या आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना ते दिसत आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. युट्युबवर मुग्धा वैशंपायन ही चांगलीच चर्चेत असते. सध्या ती आपल्या चाहत्यांना युट्यूबवरून आपल्या या प्रश्नांची उत्तरं देताना दिसते आहे. सध्या तिनं आपल्या एका मुलाखतीतून एक खुलासा केला आहे. ज्यात तिनं आपल्या आणि प्रथमेशच्या नात्यावर भाष्य केले आहे. यावेळी आपण प्रथमेशनं प्रपोज केल्यावर होकार द्यायला तीन दिवस का घेतले, यावर तिनं भाष्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की यावेळी प्रथमेशनं प्रपोज केल्यानंनतर तीन दिवस का घेतले यावर तिनं भाष्य केले आहे. यावेळी प्रथमेश म्हणाला की, ''आम्हाला दोघांनाही माहिती होतं की आमच्या दोघांच्या मनात काय आहे. तिचं (मुग्धाचं) उत्तर काय असणार हे देखील माहिती होतं. पण शेवटी थोड टांगती तलवार असते डोक्यावर तशी माझ्याही होती. माझ्या डोक्यावर तीन दिवस टांगती तलवार होती'', असं प्रथमेश म्हणाला. त्यावर मुग्धा म्हणाली की, ''मी तीन दिवसांचा कालावधी घेण्यामागे खरं तर खूप छान कारण होतं. मला त्यानं एका कार्यक्रमाच्या रिहर्सहदरम्यान विचारलं होतं. ती रिहर्सल झाल्यानंतर त्यानं मला विचारलं होतं.''


हेही वाचा - AI Photos: कपाळावर कुंकू, सोन्याचे दागिने, साडी अन् केसात गजरा; Friends दिसतात अगदी तुमच्याआमच्यासारखे!


मुग्धा पुढे म्हणाली की, ''माझ्या चेहऱ्यावरून त्याला उत्तर माहिती असेलच याची मला खात्री होती. पण तरी मी तेव्हा त्याला उत्तर दिलं नाही. त्याचं कारण म्हणजे माझा तीन दिवसांनी वाढदिवस होता. त्यामुळे मला असं वाटतं होतं की जर मला त्यानं विचारलं आहे तर आपण त्याला चांगल्या दिवशी हो म्हणू. तो दिवस कायम लक्षात राहयला हवा यासाठी मग मी तीन दिवसांचा अवधी घेतला'' त्यावर ती पुढे म्हणाली की, हो ते तीन दिवस माझ्यासाठी फारच कठीण होतं. ते दिवस घालवणं माझ्यासाठी खरंच खूप कठीण होतं. पण मी ते दिवस घालवले आणि मी शेवटी होकार दिला. 


सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाल्याचे दिसते आहे. त्यातून आता ते सध्या एवढ्यात लग्न न करण्याचेही म्हणत आहेत. प्रथमेशच्या केळवणालाही सुरूवात झाली आहे. तेव्हा येत्या काही दिवसांत कळलेच की नक्की लगीनघाई कुठपर्यंत आली आहे.