राजकीय भूमिका घेणं अभिनेत्याला पडलं भारी, मालिकेतून केलं दूर
सोशल मीडियावर किरण मानेंच्या बाजूने प्रेक्षक उभे
मुंबई : अभिनेता किरण माने यांना राजकीय भूमिका घेणं चांगलच भारी पडलं आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेत विलास पाटीलची भूमिका अभिनेता किरण माने करत होते. मात्र आता त्यांना तडकाफडकी त्यांना मालिकेतून काढून टाकणार आहे.
समाजात घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींवर अगदी मोजक्या शब्दात एक पोस्टमध्ये मांडलेलं मत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं होतं. एक मुलाखतीमध्ये माने यांनीच या संदर्भात खुलासा करत राजकीय घटनांवर भूमिका मांडल्यामुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये किरण मानेंनी मांडलेली मतं पोस्टच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. या पोस्टवरुन अनेकदा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केला जातो. त्यांचीही पोलखोल किरण माने करत असतात.
मात्र अशाप्रकारे राजकीय भूमिका घेणं त्यांना महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. किरण मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली,” असं म्हटलंय.