मुंबई : प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा सिनेमा आजही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या सिनेमात काम करणाऱ्या पात्रांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या मराठी सिनेमात काम केल्यानंतर अनेक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रविण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या सिनेमातील एक अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमात तिने चहाची टपरी चालवणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.


आता ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कोट्यवधींचा नफा कमावणारी कंपनी चालवतेय. मालविकाने मोठ्या पगाराची नोकरी करत असताना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढे ती स्वत: सेंद्रिय शेतीचा प्रयोग करु लागली.


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या, प्रवीण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या समोर आली. आयटी क्षेत्रात काम करत असताना पूर्णवेळ शेती करण्याची तीव्र इच्छा होती, असं मालविकाने एकदा सांगितलं होतं.



मालविका ही आयटी इंजिनीअर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र ही नोकरी सोडून ती शेतीकडे वळली.  


एका मुलाखतीत मालविकाने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. "शेतीशी कधी प्रत्यक्ष संबंध आला नाही. मात्र वडील मार्केट यार्डमध्ये ट्रेडर असल्यामुळे अप्रत्यक्षपणे संबंध होता.



नियमित वर्तमानपत्र, मॅगझिन्स वाचायची सवय असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या नेहमी नजरेखालून जायच्या. मन आयडी क्षेत्रात रमेनासं झालं. दुसरीकडे मला पूर्णवेळ शेती करण्याची तीव्र इच्छा होत होती. याच काळात शेतकऱ्यांचं प्रश्न मांडणाऱ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाची ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली"