मुळशी पॅटर्नच्या कमाईचे आकडे कोट्यवधींच्या घरात
सिनेमाची खतरनाक कमाई
मुंबई : मराठी सिनेमा आज सातासमुद्रापलिकडे गाजत आहे. 'सैराट' सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 करोड रुपयांचा आकडा गाठला. आता या पाठोपाठ अनेक सिनेमे वेगवेगळे विक्रम करत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'नाळ' हा सिनेमा असाच हटके ठरला. या सिनेमाने एका आठवड्यात 14 कोटी रुपयांची कमाई केली असं असताना आणखी एका सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे.
तो सिनेमा म्हणजे प्रविण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न'. प्रदर्शित होण्याअगोदरच या सिनेमाची जादू सगळीकडे पसरली. या सिनेमाने 3 दिवसांत 5 करोड रुपयांच कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केलं आहे. या सिनेमातील दिग्दर्शक प्रविण तरडे यांच आणि अभिनेता ओम भुतकरचं भरपूर कौतुक होत आहे.
हा सिनेमा रिलीज होण्याआधीच या सिनेमाची जोरदार चर्चा झाली. तसेच अनेकांना टीका देखील केली. वाढत्या शहरीकरणासाठी जमिनी बळकावल्या जातात या वादावर हा सिनेमा भाष्य करतो.
जिल्ह्यातील मूळशी तालुक्यात जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री करून शहरांची हद्दवाढत आहे. त्या वाढत्या शहरीकरणातील जमिनीच्या वादावर हा सिनेमा भाष्य करतो. ही केवळ एका तालुक्याची गोष्ट नाही, अख्या देशाची गोष्ट असल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं.