मित्रांना घातली NCB ची भीती; Aryan- Ananya चा धक्कादायक चॅट समोर
पाहा कोण, कोणास, काय म्हणालं...
मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अडचणींमध्ये दर दिवशी नव्यानं भर पडत आहे. कधी एनसीबीची चौकशी, दिवसागणिक वाढणारी कोठडी आणि कुटुंबावर वाढणारं संकटांचं सावट अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच आता अभिनेत्री अनन्या पांडे हिचंही नाव गोवलं गेल्यामुळे आता ड्रग्जची देवाणघेवाण झाल्याचंही इथं म्हटलं जात आहे. (aryan khan ananya pandey)
Aryan आणि Ananya चे असे काही चॅट समोर आले आहेत, ज्यामध्ये आर्यन कोकेन टुमोरो असं लिहिताना दिसतो. तर, एका चॅटमध्ये तो मित्रांना NCB ची भीतीही घालताना दिसतो.
व्हॉट्स अॅप चॅटमध्ये आर्यन अचित कुमारशी ड्रग्ज खरेदी करण्यासंबंधी बोलताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आर्यननं अचित कुमारकड़ून 80 हजार रुपयांचे ड्रग्ज मागवले होते.
आर्यन आणि अनन्यामध्ये पहिला चॅट मॅसेज जुलै 2019 चा आहे. विडची फार मागणी आहे, असं अनन्या इथं म्हणताना दिसते.
आर्यन- मी तुझ्याकडून गुपचूप घेतो.
अनन्या- ठीक आहे
आर्यन- वीड
अनन्या- याची जास्त मागणी आहे.
आर्यन- मी तुझ्याकडून हळूच घेईन.
अनन्या- ठीक आहे.
त्याच दिवशी अनन्या आणि आर्यनचा दुसरा चॅट
अनन्या- मी आता या बिझनेसमध्ये आहे.
आर्यन- तू वीड आणलंय?
अनन्या- मला ते मिळतंय
NCB च्या हाती लागलेल्या ताज्या माहितीनुसार नवा चॅट 18-4-2021 चा आहे. जिथं आर्यन मित्रांना कोकेनबद्दल विचारत आहे.
आर्यन- उद्या कोकेन घेऊ
आर्यन- मी तुमच्यासाठी आणतोय
आर्यन- By NCB
दरम्यान एनसीबीच्या हाती ते सर्व चॅट लागले आहेत ज्यामध्ये आर्यन आणि अनन्यासह इतरही सेलिब्रिटी किड्सचा समावेश आहे. याच धर्तीवर सध्या आर्यनची चौकशी करण्यात येत आहे.