COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : सध्या जगभरात कीकीनं अक्षरशः याड लावलंय... कीकी म्हणजे काय, हे तुम्हाला माहित नाही...? अहो, सोशल मीडियावर कीकी चॅलेंजचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतायत... ही काय भानगड आहे? तुम्हीच पाहा. या मंडळींना वेड लागलंय की काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना..? चालत्या गाडीतून उतरून डान्स करण्याचं हे कसलं खुळ...? असं तुम्हाला वाटेल... पण या सगळ्यांनी घेतलंय कीकी चॅलेंज...


कीकी डू यू लव्ह मी?


अमेरिकेत ड्रेक नावाचा एक प्रसिद्ध गायक आहे... त्याचं इन माय फिलिंग हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालंय... तुम्ही चालत्या गाडीतून उचलायचं... आणि ड्रेक भाऊंच्या या गाण्यावर डान्स करायचा... हेच आहे कीकी चॅलेंज..विल स्मिथसारखे नावाजलेले हॉलिवूड स्टारही कीकी चॅलेंज घेतायत. हॉलिवूड कशाला, आपला बॉलिवूडवाला फुकरे फेम वरूण शर्मा देखील 'कीकी डू यू लव्ह मी?' म्हणत रिक्षासोबत नाचतोय.


जबाबदारी तुमचीच


आता या सेलिब्रिटींची नक्कल सामान्य मुंबईकरांनी केली तर त्यात आश्चर्य ते काय? पण मुंबईकरांची जरा वेगळीच अडचण आहे...हे कीकी चॅलेंज धम्माल आहे, असं तुम्हाला वाटत असेल... तर मात्र सावधान... कारण कीकी करता करता अनेकांनी फे फे उडालीय. आता हे सगळं पाहून तुम्ही देखील कीकी चॅलेंज घेणार असाल, तर त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आणि फक्त तुमचीच असेल.