मुंबई : अनेक सेलिब्रिटी गरजवंताना सातत्यानं मदत करताना दिसतात. पण, हेच गरजवंत ज्यावेळी सेलिब्रिटींनाच अडचणीत आणताना दिसतात तेव्हा मात्र परिस्थिती काहीशी बदलते. सध्या गायिका नेहा कक्कर हिला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिथं तिनं गरजुंना मदतीसाठी हात पुढे तर केला, पण त्यानंतर जे घडलं ते पाहून नेहालाही धक्का बसला. 


मित्रमंडळींसमवेत आऊटिंगनंतर नेहा मुंबईतील एका लोकप्रिय हॉटेलमधून बाहेर आली. तिथे अनेक याचक उभे होते. 


नेहा कारमध्ये बसली आणि तिनं या पैसे मागणाऱ्या मंडळींना पैसे देण्यास सुरुवात केली. 


अतिशय हळू काच खाली करत तिनं 500- 500 च्या नोटा प्रत्येकाला देण्यास सुरुवात केली. पण, नेहा पैसे वाटतेय हे पाहून तिथं एकच झुंबड उडाली. 


आधी तर नेहानं स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला पण, तिथला आवाज, किंकाळ्या वाढतच चालल्या होत्या. हे पाहून नेहा हादरली, तिनं शेवटी कारमध्ये या मंडळींना पाठ दाखवत दुसरीकडे तोंड फिरवून बसणं पसंत केलं. 


सूत्रांच्या माहितीनुसार हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे. असं असलं तरीही हल्ली मुंबईच्या वांद्रे भागात असणाऱ्या काही प्रसिद्ध हॉटेलबाहेर असंच चित्र पाहायला मिळत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Voompla (@voompla)


कलाकार मंडळी हॉटेलमधून बाहेर येताच त्यांच्याभोवती पैसे मागणरे एकच गराडा घालतात आणि त्यांना भांडावून सोडतात. 


आता यावर नेमका काय आणि कसा तोडगा काढावा हाच अनुत्तरित प्रश्न.