Mumtaz - Asha Bhosle Dance Video : 'कोई शहरी बाबू दिल लहरी बाबू, हाय रे पग बांध गया घुंघरू… मैं छम छम नचदी फिरां…' हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, कधी तरी गाणं गुनगुनल असेल, अगदी कधीतरी यावर डान्सही केला असेल. हे गाणं आठवलं की डोळ्यासमोर सुंदर अभिनेत्री मुमताज येते. हे गाणं ऐकलं की कायम प्रसन्न आणि आनंद मिळतो. हे गाणं लागल्यावर आपण थिरकल्याशिवाय राहत नाही. हे गाणं मुमताज यांच्यामुळे अधिक खास झालं आहे. त्यांच ते सौंदर्य आणि स्मित हास्य आजही चाहत्यांना वेड लावतं. त्यात या गाण्याला आवाज दिला तो आशा भोसले यांनी...(mumtaz dance with asha bhosle on koi sehri babu video goes viral on Internet trending news)


ओल्ड इज गोल्ड! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर मुमताज यांच्या या गाण्यावरील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत ज्येष्ठ गायिका आशा भोसलेही नाचताना दिसतं आहे. आशाताई आणि मुमताजचा हा क्यूट व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदाने नाचू लागले आहेत. या दोघींना पाहून आनंदाला वयाचं बंधन नसतं असेच प्रत्येकाच्या ओठावर येईल. 


आनंदाला वयाचं बंधन नसतं!


मुमताज या आपल्या काळातील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 31 जुलै 1947 रोजी जन्मलेल्या मुमताज आता 76 वर्षांच्या आहेत. पण आजही त्यांचं डान्सवरील प्रेम आणि त्यांच्यामधील ऊर्जा पाहून अवाक् व्हायला होतं. लोफर चित्रपटातील कोई शहरी बाबू हे प्रसिद्ध गाण आहे. या गाण्यावर अभिनेत्री मुमताज यांचा डान्स आणि आशाताईंचा आवाज त्यामुळे हे गाण आजही सर्वांना मंत्रमुग्ध करतं. त्यात या गाण्यावर मुमताज आणि आशा ताईं यांचा हा डान्स अगदी दुर्मिळ असा हा क्षण आहे. 



मुमताज आजही त्याच स्टाइलने डान्स करताना पाहून चाहते बेभान झाले आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, दोन तारे एकत्र, तर दुसरा म्हणतो उफ्फफ प्युअर गोल्डन बॉलिवूड.


12 मार्च 1973 ला 'लोफर' हा चित्रपट आला होता. ज्यात धर्मेंद्र, मुमताज, ओमप्रकाश, प्रेमनाथ, फरीदा जलाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. ए. भीम सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला खूप यश मिळालं होतं.