Munawar Faruqui: स्टँड-अप कॉमेडियन आणि 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता मुनावर फारुकी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मात्र, त्याला त्याचे वैयक्तिक आयुष्य माध्यमांपासून दूर ठेवणे आवडते. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या मुलाबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्याचा मुलाला एका गंभीर आणि दुर्मिळ आजाराने ग्रस्त झालेला, ज्यावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेनिस सिक्वेरा हिच्या पॉडकास्टमध्ये मुनावरने सांगितले की, त्याच्या मुलाला 'कावासाकी' नावाचा गंभीर आजार झाला होता. त्यावेळी त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते. या घटनेचा त्याच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आणि त्याला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. मुनावरने सांगितले की, त्याचा मुलगा दीड वर्षांचा असताना त्याची प्रकृती खालावली होती. पहिल्या 2-3 दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.  


मुलाच्या आजारामुळे घाबरलेला मुनावर...
रुग्णालयातील डॉक्टरांनी मुनावरला म्हणाले, 'तुझ्या मुलाला कावासाकी हा आजार झाला आहे'. या उपचारासाठी तीन इंजेक्शनची आवश्यकता होती, ज्याची किंमत 25,000 रुपये होती. त्यावेळी मुनावरकडे फक्त 700-800 रुपयेच होते आणि तीन इंजेक्शनसाठी 75,000 रुपये लागणार होते. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला. डॉक्टरांशी बोलताना शांत दिसण्याचा प्रयत्न करत असल्याची आठवण त्याने सांगितली. इंजेक्शन आणतो, असे आश्वासन त्याने डॉक्टरांना दिले. मात्र, रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर तो 30-40 मिनिटे स्तब्ध उभा राहिला. त्याला काय करावे, हे सुचत नव्हते. तो त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता.  



कर्ज घेऊन उपचाराची व्यवस्था केली
मुलाच्या अवस्थेमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे मुनावर खूप दु:खी झाला होता, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. त्या कठीण काळात, मुनावरने पूर्वी काम केलेल्या ठिकाणाहून पैसे उसने मागितले. तो मुंबई सेंट्रलला गेला आणि तीन तासांत पैसे घेऊन परत आला. उपचाराचा खर्च भागवला गेला, पण त्याची काळजी काही कमी झाली नाही. त्याने सांगितले की 'त्या दिवशी त्याचे हसूच हरवले होते, कारण हा विषय केवळ पैशाचा नव्हता, तर त्याच्या मुलाच्या आयुष्याचा होता.'  


आर्थिक स्वावलंबनाचा धडा घेतला
पॉडकास्टमध्ये या अनुभवाविषयी बोलताना मुनावर म्हणाला की 'या घटनेने त्याला आयुष्याचा मोठा धडा शिकवला'. त्यानंतर त्याने ठरवले की भविष्यात कधीही अशा परिस्थितीत अडकू नये. त्याने स्वतःला इतके सक्षम बनवायचे ठरवले, की त्याला कधीच कोणाची मदत घ्यावी लागणार नाही. ही घटना मुनावरसाठी भावनिक होतीच, पण त्याच्या आयुष्याला नवी दिशा देणारीही ठरली