मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये बबिता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मुनमुनची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. अभिनेत्रीला सोशल मीडियावर 7.4 मिलियन अधिक लोक फॉलो करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुनमुन चाहत्यांना नेहमीच अपडेट्स देत असते. आता अभिनेत्री थायलंडमध्ये सोलो ट्रिपचा आनंद घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनमुनने सोलो ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान मुनमुन अशा गावी पोहोचली ज्याठिकाणी राहणाऱ्या लोकाची मान लांब आहे. या गावाला 'लॉन्ग नेक' म्हणून ओळखलं जात.  मुनमुनने गावार राहणाऱ्या रहिवाशांसोबत फोटो देखील काढले.


फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'वर्षांपूर्वी देखील मी या व्यक्तींबद्दल वाचलं आहे. यांच्याविषयी विविध माहितीपटांमध्ये पाहिल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक होती. शेवटी थायलंड-बर्मा सीमा प्रदेशात आढळणाऱ्या केरेन जमातीतील महिलांना भेटण्याची संधी मिळाली.' असं लिहिलं आहे. 



एवढंच नाही तर, येथे राहणाऱ्या प्रत्येकाची कथा विलोभनीय असल्याचं देखील मुनमुनने पोस्ट मध्ये लिहिलं आहे. मुनमुन कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. 


सोशल मीडियावर देखील ती कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मुनमुन कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.