Urfi Javed Controversy:  सोशल मीडिया स्टार आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) मोठ्या संकटात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी  जावेद विरोधात सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) उर्फी जावेदची चौकशीचे केली होती. यानंतर आता उर्फी जावेदने या राजकीय दबावामुळे मोठ्या अडचणीत सापडल्याचे म्हटले आहे. उर्फीने ट्विट करत आपली व्यथा मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेदला मुंबईत घर मिळेना. उर्फीनं ट्विट करत आपली व्यथा मांडली आहे. कपड्यांमुळे मुस्लीम घर मालक घर देत नाहीत. तर हिंदू घर मालक मुस्लीम असल्यानं घर देत नाहीत. तर, राजकीय धमक्यांमुळे काही घर मालक घर देत नाहीत अस उर्फीचं म्हणणं आहे. मुंबईत घर शोधणं हे माझ्यासाठी खूपच अवघड झाले आहे. यामुळे मी  मोठ्या संकटात सापडले आहे असेही उर्फीने म्हटले आहे. 


उर्फी जावेदही चित्र विचित्र फॅशन, तोकडे आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे यामुळे नेहमीच ट्रोल होत असते. तिच्या या अशा कपड्यांमुळेच चित्रा वाघ तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. उर्फीने मात्र, थेट त्यांच्याशीच पंगा घेतला आहे. पोलिस चौकशीतही तिने याचा खुलासा केला आहे.


अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांबाबत उर्फीचा खुलासा


मी भारताची सन्माननीय नागरिक आहे. मला माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा, वागण्याचा बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे. मी जे कपडे घालते ते माझ्या आवडीने घालते.  माझे असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही असं उर्फी पोलिस चौकशीत म्हणाली होती. मी जे कपडे घालते ते माझ्या प्रोफेशन आणि कामाचा एक भाग आहे. माझ्या कामाच्या हिशोबाने मी कपडे घालते. त्यावरून माझं फोटोशूट होत असत. कधी कधी कामाची इतकी घाई असते की कपडे बदलण्याचा वेळ मिळत नाही. यामुळे तसेच बाहेर पडावे लागते  त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात. यानंतर हे फोटो व्हायरल होतात ते मी कसे थांबवू असा जवाब उर्फीने  दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.