मुंबईः- साऊथ सुपरस्टार दलपती विजय याचा 'बीस्ट' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. मात्र, रिलीज होण्यापूर्वीच हा सिनेमा वादात सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुवेत-कतारमध्ये या सिनेमावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतातही या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.


काय आहे प्रकरण?


अभिनेता दलपती विजय याचा 'बीस्ट' अर्थात 'रॉ' हा सिनेमा मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे. मुस्लिमांना या सिनेमात वादग्रस्त भूमिकेत दाखवल्याचा आरोप करण्यात येत आहे. अभिनेता दलपती विजय या सिनेमात एका 'रॉ' एजंटच्या भूमिकेत आहे. 


विजय एक हायजॅक झालेला मॉल दहशतवाद्यांपासून वाचवताना दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या सिनेमातील काही दृश्यांवर मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे एमएमकेचे अध्यक्ष एम.एच. जवाहिरुल्लाह यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना पत्र लिहून सिनेमा भारतात प्रदर्शित न करण्याची विनंती केली आहे.


नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोरोनाची महामारी, यासारख्या संकटात मुस्लिम समाज लोकांच्या मदतीला धावून गेला. मात्र, या सिनेमातून मुस्लिमांना बदनाम केलं जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांचा आहे. 'विश्वरूपम' आणि 'थुपक्की' सारख्या सिनेमातून आधीच मुस्लिम समाजाला बदनाम केलं असून त्यात आता 'बीस्ट'ची भर पडलीय असं संघटनांचं म्हणणं आहे.


 सन पिक्चर्स द्वारा निर्मित आणि नेल्सन दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. अभिनेता दलपति विजय हा सिनेमात मुख्य भूमिकेत आहे तर अभिनेत्री पूजा हेगडेचीही नवी भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी अभिनेता विजयने 100 कोटींचं मानधन घेतल्याची माहिती मिळतेय