त्रिसूर : एखादी कला जपण्यासाठी, त्या कलेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी कलाकाराला अनेक वर्ष लागतात. पण जेव्हा त्या कलेचा आणि कलाकाराचा अपमान करण्यात येतो... तेव्हा कलेला खरंच महत्त्व आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. शास्त्रीय कलेचं उगमस्थान म्हणजे भारत... पण भारतामध्येचं कलाकार मुस्लीम असल्यामुळे तिचा विरोध होतो... हे फार दुर्दैवी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमधील त्रिसूर (Thrissur) जिल्ह्यातील मानसियालाने भरतनाट्यममध्ये प्रावीण्य मिळवले. शिवाय ती भरतनाट्यममध्ये पीएचडी देखील करत आहे. तिने अनेक ठिकाणी आपली कला सादर करत अनेक मुलींना नृत्याची प्रेरणा दिली.. 


पण आता तिच्या कलेला विरोध केला जात आहे. आधी मौलवींनी तिचा विरोध केला, त्यानंतर मंदिरामध्ये कला सादर करण्यास तिला रोखलं. मानसियाला मुस्लीम असल्यामुळे तिला अनेकदा धर्मांधांकडून विरोध केला जातोय. 


मानसियाला फेसबूक पोस्टमध्ये म्हणते, 'काही दिवसांपूर्वी एका मंदिर माझा कर्यक्रम होता, पण हिंदू नसल्यामुळे तुम्ही मंदिरात प्रदर्शन करू शकत नसल्याचं मंदिराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.' त्यामुळे भारतातचं कलाकारांना आशा धार्मीक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. 


एवढंच नाही तर, मानसियाला हिंदू मुलासोबत लग्न केल्यामुळे देखील सवाल करण्यात आले. मानसियाने हिंदू संगीतकार श्याम कल्याणसोबत लग्न केलं आहे. तिने धर्म परिवर्तन करून हिंदू धर्म स्वीकारल्यावरुनही सवाल उपस्थित केले जातात. 


दोन्ही समाजाकडून मानसियाला आणि तिच्या कलेला होणारा विरोध पाहाता, कलेला पण धर्म असतो का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.