Mylek Movie Special Screening : 'मायलेक' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाती गाणीही गाणीही सध्या ट्रेण्डिंगमध्ये असून त्यावर 'मायलेकीं'चे रिल्सही झळकत आहेत. चित्रपट पाहाताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवत आहेत. आई आणि मुलींना जवळ आणणारा हा 'मायलेक' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, असे दिसतेय. दरम्यान, सोनाली खरे आणि 'सोसायटी फॉर दि एज्युकेशन ऑफ दि चॅलेन्जेड' या संस्थेने या विशेष मुलांसाठी 'मायलेक'च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. यावेळी अनेक पाल्य- पालकांनी, संस्थेतील शिक्षकांनी हा चित्रपट एन्जॉय केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबद्दल सोनाली खरे म्हणाली, "प्रत्येक आईला आपली मुलं प्रिय असतात आणि प्रत्येक मुलाचं आपल्या आईवर प्रेम असतं. आज इथे जमलेल्या आई आणि मुलांना बघून खूप छान वाटलं. त्यांनी हा चित्रपट आवडीनं पाहिला इतकंच नाही तर त्यावर प्रतिक्रिया दिल्या. हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. 'सोसायटी फॉर दि एज्युकेशन ऑफ दि चॅलेन्जेड' या संस्थेचेही मी आभार मानते, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, अभिनय सगळ्यांचेच कौतुक होत आहे. गाणीही सध्या ट्रेण्डिंगमध्ये असून त्यावर 'मायलेकीं'चे रिल्सही झळकत आहेत. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित आहे. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते असून नितीन प्रकाश वैद्य 'मायलेक'चे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. 


तर या चित्रपटात भूमिका साकारण्याविषयी उमेश कामत म्हणाला की '' ज्यावेळी सोनालीने मला या चित्रपटासाठी फोन केला त्यावेळीच तिने मला भूमिका काय असणार याची पूर्वकल्पना दिली आणि ही भूमिका तू करणार का विचारले आणि यावर माझे उत्तर हो होते. मला ही कथाच मुळात इतकी आवडली की माझ्या भूमिकेची लांबी किती आहे, हे माझ्यासाठी त्यावेळी महत्वाचे नव्हतेच. मी विषयाला प्राधान्य दिले. या नात्याचा मी नेहमीच आदर करतो. खूप सुंदर असे हे नाते आहे. प्रिया आणि तिच्या आईचे नाते मी जवळून अनुभवले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी सोनाली आणि सनायाचेही नाते मला अनुभवता आले. इंडस्ट्रीमध्येही अशा अनेक 'मायलेकी' आहेत, ज्यांचे नाते खूपच सुंदर आहे. हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर येतोय, खूप भारी आहे, म्हणून हा चित्रपट मी केला.'' 


हेही वाचा : "मला मुलं नाही तर मुली आवडतात...", ऑस्कर विजेत्या गायिकेच्या खुलाशानंतर खळबळ


या चित्रपटात तीन पिढ्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक म्हणजे सोनाली खरे आणि सनाया आनंद. दुसरी मायलेकीची जोडी म्हणजे सोनाली खरे आणि तिची आई कल्पिता खरे. या तिघींना एकाच चित्रपटात पाहून सगळ्यांनाच आनंद झाला आहे.