Aashka Goradia pregnant: सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री या आपल्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या चाहुलीनं उत्सुक झाल्या आहेत. आज मदर्स डेच्या (Mothers Day) निमित्तानं नागिन फेम अभिनेत्रीनं इन्टाग्रामवरून आपण आई होण्याची गुडन्यूज दिली आहे. त्यामुळे सध्या तिची पोस्ट सगळीकडेच व्हायरल होते आहे. या अभिनेत्रीनंच नाव आहे आशका गोराडिया. आशका गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. तिनं नागिन या लोकप्रिय मालिकेतून भुमिका केली असून त्याशिवाय अनेक लोकप्रिय मालिकांमधून (Naagin Fame actress Aashka Goradia) भुमिका केल्या आहेत. एकता कपूरच्या कुसुम या मालिकेतूनही तिनं महत्त्वाची भुमिका केली आहे.(naagin serial fame actress aashka goradia is going to be a mother soon after 6 years of marriage shares an instagram post)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिनं आपल्या फॅन्सना हटके प्रकारे शुभेच्छा देत आपण लवकरच आई होणार असल्याची गुड न्यूजही दिली आहे. 37 वर्षीय अभिनेत्री लग्नाच्या 6 वर्षांनंतर आई होणार आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.  तिनं ही गुडन्यूज देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या कमेंटमध्ये लिहिलं आहे की, या मातृदिनाच्या निमित्तानं अजून काहीतरी स्पेशल येते आहे. आमचा परिवार आणि नातं या नोव्हेंबरपर्यंत अजून एका पाहुण्याच्या आगमानानं फुलणार आहे. आमच्यासाठी प्रेम पाठवा कारण आम्ही (Instagram Post) एका वेगळ्या प्रवासासाठी निघालो आहोत. बेबी इज ऑन द वे. आणि हॅशटॅगमध्ये लिहिलंय पेरेन्ट्स टू बी!


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका बीचप्रमाणे एका ग्राफिक्स तयार केलं आहे ज्यात असं लिहिलंय की, आमचं बाळ लवकरच या जगात प्रवेश करेल. 2023 च्या नोव्हेंबरची आम्ही वाट पाहतो आहोत. आम्हाला प्रेम वाटावे. आशका आणि ब्रेंट. यावेळी टेलिव्हिजन विश्वातीलही अनेक सेलिब्रेटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मातृदिनाचे औचित्य साधून तिनं ही खुशखबर दिल्यानं तिच्या चाहत्यांना अजून आनंद झाला आहे. 


हेही वाचा - 'आई पहिला संस्कार'; लिटिल चॅम्प्स फेम आर्या आंबेकरची लक्षवेधी पोस्ट



त्यामुळे चाहतेही त्यांच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करतान दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिनं आपण लवकरच आई होत असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.