Arya Ambekar Post on Mother's Day: अभिनेत्री-गायिका आर्या आंबेकर (Arya Ambekar Instagram)ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. ती आपल्या पोस्ट या अनेकदा सोशल मीडियावर शेअर करते. आज मदर्स डे आहे आणि त्यानिमित्ताने आर्यानं आपल्या आईचा एक फोटो शेअर करत आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिनं एक खास गाणंही शेअर केलं आहे. हे गाण तिनं चार वर्षांपुर्वी युट्यूबवर अपलोड केलेलं असून यावेळी तिनं ते खास मदर्स डे साठी शेअर केलं आहे. आई पहिला संस्कार असं या गाण्याचे नावं आहे. (arya ambekar shares mothers day special post on instagram)
आर्यानं आपल्या आईसोबतचे काही लहानपणीचे फोटोजही शेअर केले आहेत आणि (Little Champs) कॅप्शनमध्ये इंटरस्ट्रिंग मेसेजही लिहिला आहे. लिटिल चॅम्प्स या 2008 साली आलेल्या झी मराठी वाहिनीवरील सांगितिक कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यावेळी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आर्या आंबेकरसह, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत हे तेव्हाचे टॉप 5 स्पर्धक होते.
आर्याची आई श्रुती आंबेकर याही गायिका आहेत. त्यांच्याकडून तिनंही गायनाचे धडे गिरवले. साडेपाच वर्षांची असल्यापासूनच तिनं गायनाला सुरूवाता केली. वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची परीक्षाही दिली. यावेळी आपल्या आईला मदर्स डेच्या निमित्तानं तिनं शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देत आर्या म्हणते की, ''आई तुला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा! तू खूप सुंदर आहेस आई'', असं तिनं म्हटलं आहे. आईला तिनं यावेळी आईची स्तुती करणारं एक खास गाणंही समर्पित केलं आहे. आई पहिला संस्कार हे गाणं आर्यानं गायलं असून ते अरूण सांगोळे यांनी लिहिले आहे.
आर्या आंबेकरनं 2017 साली आलेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिच्या या चित्रपटातील भुमिकेचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटातील भुमिकेसाठी किता खूप पुरस्कारही मिळाले होते. मराठी चित्रपटांमध्ये ती पार्श्वगायिका आहे. नुकतंच तिनं चंद्रमुखी या चित्रपटातील बाई गं हे गाणं गायलं आहे. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आर्या अनेक सांगितिक कार्यक्रमांमधूनही दिसते. त्याचबरोबर इन्टाग्रामनवरही ते रिल्स पोस्ट करत असते. इन्टाग्रामवर तिचे 10 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. मध्यंतरी आलेल्या सारेगमप लिटिल चॅप्म्सच्या पर्वाचे तिनं जजिंगही केले होते. यावेळी पाचही लिटिल चॅप्म्स जज होते.