मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर ‘नाच गं घुमा’चा परदेशात डंका!
Nach Ga Ghuma Movie : `नाच गं घुमा` या मराठमोळा चित्रपटाचा आता परदेशात डंका...
Nach Ga Ghuma Movie : मराठी कलाविश्वात सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरुआहे. या चित्रपटाचं सुंदर कथानक घराघरांतल्या प्रत्येक महिलेला भावलं. चित्रपटानं प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. ‘नाच गं घुमा’नं मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर आता ‘नाच गं घुमा’ थेट परदेशवारीवर जाणार आहे. यासंदर्भातील खास पोस्ट निर्माता स्वप्नील जोशीने शेअर केली आहे.
‘नाच गं घुमा’ चित्रपटात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दोघींच्या अफलातून जुगलबंदीची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते. याशिवाय ‘नाच गं घुमा’ला एकूण 6 निर्माते लाभले आहेत. स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आणि तृप्ती पाटील यांनी एकत्र मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता संपूर्ण राज्यभरात कौतुकाची थाप मिळवल्यावर ‘नाच गं घुमा’ अमेरिकेत दाखवला झाला आहे.
‘नाच गं घुमा’च्या टीमनं परदेशातील प्रेक्षकांसाठी या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं आहे. अमेरिकेतील ऑस्टिन, डॅलस, SFO bay area, हॉस्टन, सीऐटल, लॉस एंजेल्स या शहरांमध्ये 18 ते 19 मे दरम्यान चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात येईल. याशिवाय जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा या देशांमध्ये सुद्धा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'नाच गं घुमा’ चित्रपट थेट जाऊन पोहोचलाय अमेरिकेत! काय मग? आपल्या लाडक्या घुमांचं स्वागत दणक्यात करणार ना?” अशी पोस्ट शेअर करत स्वप्नीलनं व्हिडीओमध्ये अमेरिकेतील कोणत्या चित्रपटगृहांमध्ये किती शो होणार याची माहिती दिली आहे. याशिवाय प्रेक्षकांना तिकीटं कुठे बूक करता येतील याबद्दल देखील स्वप्नीलनं पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
हेही वाचा : शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन ठेवायचे 'समलैंगिक संबंध'! गायिका स्पष्टच बोलली
दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटविषयी बोलायचं झालं तर, यामध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्यासह सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मधुगंधा, परेश, स्वप्नील या मंडळींचा नुकताच आलेला ‘वाळवी’ चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजला आणि लोकप्रिय झाला. 'हरीश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'चि सौ कां', 'आत्मपॅम्प्लेट', 'वाळवी' यांसारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ची ही पुढील प्रस्तुती आहे.