शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन ठेवायचे 'समलैंगिक संबंध'! गायिका स्पष्टच बोलली

Shah Rukh Khan -Karan Johar : शाहरुख खान आणि करण जोहर विषयी लोकप्रिय गायिकेनं केला खुलासा... 

दिक्षा पाटील | Updated: May 17, 2024, 05:34 PM IST
शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन ठेवायचे 'समलैंगिक संबंध'! गायिका स्पष्टच बोलली title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan -Karan Johar : लोकप्रिय गायिका सुचित्रा रामादुरई तिच्या स्टेटमेंटमुळे वादात अडकते. सुचित्रा ही नेहमीच कलाकारांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता सुचित्रानं पूर्वाश्रमीचा पती कार्तिक कुमार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि करण जोहर विषयी एक मोठा दावा केला आहे. सुचित्रानं कार्तिक कुमार, शाहरुख खान आणि करण जोहरला 'गे' म्हटलं आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...

गायिका सुचित्रानं तमिळ मीडिया कुमुदमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि सुपरस्टार शाहरुख खानविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. सुचित्रानं चर्चेचे दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतलं आणि दावा केला की त्यांच्यात समलैंगिक संबंध आहेत. सुचित्रानं हा देखील दावा केला की तिचा Ex पती कार्तिक कुमार हा 'समलैंगिक' आहे. तिनं हा देखील आरोप केला की लंडनमध्ये करण आणि शाहरुखसोबत त्याचं गे एनकाउंटर झाला होता. सुचित्रानं हे देखील सांगितलं की अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटी अशा देशात जातात जिथे समलैंगिक संबंध ठेवणं वैध मानलं जातं. 

तिच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये ती बोलताना दिसते की एकदा जेव्हा कार्तिक लंडन ट्रिपवर होता. तेव्हा त्याची भेट करण जोहर आणि शाहरुख खानशी झाली होती आणि ते एका खूप बार असलेल्या गल्लीतून फिरत होते. ते क्रॉस-ड्रेस्ड होते. हे असं काही आहे जे करण आणि शाहरुख हे परदेशात फिरायला जातात तेव्हा करतात. ते अशा प्रकारचे कपडे परिधान करुन गे एरियामध्ये जातात. ते अशा ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मिसळतात आणि रात्री मज्जा करतात." 

हेही वाचा : 'आयुष्यात कोणी स्पेशल येणार आहे'; प्रभासच्या पोस्टनं लग्नाच्या चर्चांना उधाण

सुचित्राचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर आता सुचित्राचा एक्स पती कार्तिकनं दावा केला की जर तो समलैंगिक असता, तर त्यानं गर्वानं हे स्वीकारलं असतं. कार्तिकनं पुढे सांगितलं की "जर मी समलैंगिक आहे, तर मला समलैंगिक असण्यावर लाज वाटणार नाही. मला कोणत्याही प्रकारे किंवा लैंगिक संबंध ठेवण्यावर गर्व झाला असता."