`गेल्या जन्मी मी...?` Naga Chaitanya सोबत रिलेशनमध्ये असलेल्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
Naga Chaitanya सोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगताच अभिनेत्री का म्हणतेय, `गेल्या जन्मी मी.... ?`
मुंबई : झगमगत्या विश्वात अधिक चर्चेचा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर्स. घटस्फोटानंतर अनेक जोडप्यांनी आपल्या नात्याच्या स्वीकार सर्वांसमोर केला, तर काहींनी मात्र गुपित ठेवलं. काही सेलिब्रिटींच्या नात्याच्या तर फक्त चर्चा सुरु असतात. त्यातील एक अभिनेता म्हणजे नागा चौतन्य. साऊथ स्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा प्रभूचा (Samantha Prabhu) काही महिन्यांपूर्वीचं घटस्फोट झाला होता.
घटस्फोटानंतर आता नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आल आहे.
दरम्यान, शोभिताची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने लिहिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शभिताने स्वतःचा फोटो पोस्ट करत, कॅप्शनमध्ये, 'मी गेल्या जन्मी खार असण्याची दाट शक्यता आहे...' असं लिहिलं आहे.
सध्या शोभिताची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समांथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या 4 वर्षांनी दोघांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या चाहत्यांसाठी फार धक्कादायक होता.
सोशल मीडियावर आजही दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. नागा चैतन्य आता आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर समंथा ‘शंकुतलम’ आणि ‘यशोदा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.