Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघे आज आयकॉनिक अन्नपूर्णा स्टूडियोमध्ये कुटुंबीय आणि विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत सात फेरे घेणार आहेत. अलीकडेच, नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाला खास पाहुणे दोन्ही कुटुंबात सामील होणार आहेत. ते खास पाहुणे कोण असणार आहेत याची यादी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबांनी तयारी पूर्ण केली असून हा दिवस दोघांसाठी खास बनवण्याचा निर्णय घेतला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील काही खास पाहुणे या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 


नागा-शोभिताच्या लग्नातील पाहुण्यांची यादी 


नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नसोहळ्याला 'पुष्पा' स्टारसर, फिल्म इंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटी देखील या हाय-प्रोफाइल लग्नाला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रभास, एसएस राजामौली सारखे अनेक मोठे कलाकार देखील या लग्नाला उपस्थित राहू शकतात. तर रिपोर्टनुसार, राम चरण आणि महेश बाबू यांसारख्या कलाकारांची देखील नावे सध्या समोर येत आहेत. परंतु, कुटुंबाने अद्याप पाहुण्यांच्या यादीबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाहीये.



विवाहसोहळ्यासाठी असणार खास लूक 


शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाच्या अपडेट्सवर चाहते लक्ष ठेवून आहेत. शोभिताने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी लग्नापूर्वीच्या अनेक विधींची झलक शेअर केली होती. लग्नसोहळ्याच्या विधींमध्ये पेली कुटुरू, पेली राता, मंगलास्नानम यांचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये हा विधी मुलगी वधू होण्यापूर्वी केला जातो. यामध्ये नागा चैतन्य त्यांच्या आजोबांच्या स्टुडिओमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सात फिरे घेतील आणि त्यांचा पांचा परिधान करतील. तर शोभिता आंध्र प्रदेशातील पोंडुरू येथील हाताने विणलेली पांढरी खादीची साडी परिधान करणार आहे.