मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता नागार्जुन (Nagarjuna) हा गेल्या काही दिवसांपासून 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नागार्जुनचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. आज सगळ्यांच्या लाडक्या नागार्जुनच्या आलिशान जीवनशैली (Nagarjuna Expensive Lifestyle) विषयी जाणून घेऊयात... नागार्जुनचं घर त्याच्या जवळ असलेल्या गाड्यांपर्यंत (Nagarjuna Car Collection) सगळ्याविषयी वाचून तुम्हीही व्हाल थक्क...


आणखी वाचा : हाय स्लीट ड्रेसमध्ये मलायकाच्या बोल्ड अदा! ठरतोय चर्चेचा विषय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागार्जुनकडे गाड्यांचा कलेक्शन आहे. त्यापैकी बीएमडब्ल्यू सगळ्यात चांगली आहे. रिपोर्टनुसार, नागार्जुनकडे काळ्या रंगाची लक्झरी BMW सीरीज 7 आहे. या गाडीची किंमत सुमारे दीड कोटी आहे. BMW व्यतिरिक्त, नागार्जुनकडे Audi A7 देखील आहे. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान आणि सर्वोत्तम दिसणारी ऑडी सेडान पैकी एक आहे. भारतात या कारची विक्री आता थांबली असली तरी मनोरंजक गोष्ट म्हणजे नागार्जुन अनेकदा ऑडी 7 या गाडीतून फिरताना दिसतो. नागार्जुनच्या या आवडत्या ऑडी कारची किंमत 90 लाख रुपये आहे. (nagarjuna expensive lifestyle a luxury know his collection from home to car and networth) 


आणखी वाचा : दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला...



नागार्जुनचं घर सर्वाधिक चर्चेत आहे. नागार्जुन हे घर (Nagarjuna Home) हैदराबादच्या उच्चभ्रु परिसरात आहे. हैदराबादमधील फिल्मसिटी परिसरात त्यांचं घर आहे. नागार्जुनचे हे घर अतिशय आलिशान आणि विस्तृत आहे. सध्याच्या किंमतीनुसार या आलिशान घराची किंमत सुमारे 42.3 कोटी रुपये आहे.


आणखी वाचा : 50 व्या वाढदिवसाच्या दिवशी न्यूड झाली ही अभिनेत्री, बोटॉक्स विषयी केला धक्कादायक खुलासा


नागार्जुनच्या गाड्यांची रेंज आणि त्याची एकूण संपत्ती पाहता, त्याची नेटवर्थ कमी नाही हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. नागार्जुन हा भारतातील सर्वात जास्त मानधन घेतलेल्या कलाकारांपैकी एक आहे. ज्याच कारण त्याच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय आणि लोकप्रियता आहे. याशिवाय, तो अनेक मोठ्या ब्रँडची जाहिरातही करतो. रिपोर्टनुसार नागार्जुनची एकूण संपत्ती ही 123 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 950 कोटी रुपये इतकी आहे. (Nagarjuna Net Worth)


आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक


नागार्जुनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्रवीण सत्तारू (Praveen Sattaru) दिग्दर्शित 'द घोस्ट' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा एक थ्रिलर तेलगू चित्रपट असून तो हिंदी भाषेतही चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नागार्जुन व्यतिरिक्त सोनल चौहान (Sonal Chauhan) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 5 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.