Nagraj Manjule Summons : लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडतात. त्यांच्या चित्रपटांची पटकथा ही नेहमीच वेगळी आणि हटके असते. नेहमीच गाजलेल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारे नागराज मंजुळेंचा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या खाशाबा जाधव या चित्रपटाची कथा ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नक्की काय प्रकरण आहे हे जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागराज मंजुळे यांनी घोषणा केलेल्या या चित्रपटाची मुळ कथा ही लेखक संजय दुधाणे यांची आहे. त्यामुळे त्यांनी नागराज मंजुळे यांच्यासोबत जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात कॉपीराईटचा दावा दाखल केला आहे. यामुळे नागराज मंजुळेसह इतर सगळ्यांना समन्स बजावले आहे. 


दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिलेत. चाहत्यांमध्ये देखील नागराज मंजुळे यांची फार मोठी क्रेझ आहे. एका पाठोपाठ एक हीट सिनेमे देणारे नागराज मंजुळे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या सिनेमाची कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी केलं आहे.


हेही वाचा : 'तो माझ्यासाठी...' ए.आर रहमानसोबतच्या रिलेशनशिप बॉन्डिंगवर मोहिनी डेनं सोडलं मौन


खाशाबा जाधव यांच्याविषयी बोलायचं झालं या चरित्र पुस्तकाचे हक्क संजय दुधाणे यांनी 2001 मध्ये खरेदी केलेत. त्यामुळे आता या कथेचे कॉपी राईटचे हक्क हे आता दुधाणे यांच्याकडे आहेत. चित्रपटासोबत निर्मिती आणि प्रदर्शन करण्यासाठी मनाई आणि ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अ‍ॅड. रविंद्र शिंदे व अ‍ॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे व ज्योती देशपांडे यांना हजर रहाण्याचे समन्स पाठवले आहेत. दरम्यान. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्यांचे सगळेच चित्रपट हे गाजले आहेत. त्यांच्या चित्रपटांच्या यादीत 'फॅन्ड्री', ‘नाळ’, 'सैराट', 'झुंड', ‘नाळ 2’ हे चित्रपट आहेत.