Mohini Dey on her Relationship With AR Rahman : गेल्या बऱ्याच दिवसांपासून लोकप्रिय संगीतकार आणि गायक एआर रहमान त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. एआर रहमान आणि सायरा बानो यांनी घटस्फोट घेत असल्याचं सांगत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. त्याच्या काही काळानंतर एआर रहमानची बेसिस्ट मोहिनी डेनं देखील तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला. ज्यानंतर मोहिनी डे आणि एआर रहमानच्या लिंकअपच्या चर्चा रंगू लागल्या. या सगळ्या अफवांनंतर मोहिनी डेनं एक व्हिडीओ शेअर करत नाराजगी व्यक्त केली आहे.
मोहिनी डेनं तिची चिंता व्यक्त करत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं म्हटलं की चुकीची माहिती देत ट्रोल करणाऱ्यांवर टीका केली आहे. मोहिनी डेनं सांगितलं की ती एआर रहमानला तिचे आदर्श आणि वडिलांच्या जागी मानते. त्यामुळे खोट्या अफवा पसरवणाऱ्यांर टीका करत मोहिनी म्हणाली एआर रहमानची मुलगी तिच्या वयाची आहे. तर लोकांनी त्यांच्या प्रायव्हसीचा सन्मान करण्यास सांगितलं आणि म्हटलं की घटस्फोट घेणं ही खासगी गोष्ट असून हे खूप दु:ख दायक आहे.
मोहिनीनं या व्हिडीओला शेअर करत एक भलं मोठं कॅप्शन देखील दिलं आहे. माझ्या आणि एआर रहमानच्या विरोधात काही खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पाहणं खूप वाईट आहे. यामुळे गुन्हेगार असल्याचं वाटू लागलं आहे. मी माझ्या वेळेचा आदर करते. एका मुलीनं ए.आर. रहमानसोबत त्याच्या चित्रपट, टूर इत्यादींमध्ये काम करण्यासाठी 8.5 वर्षे काम केले. अशा भावनिक बाबींबद्दल लोकांमध्ये आदर नाही, सहानुभूती नाही हे पाहणे खूपच निराशाजनक आहे. लोकांची मानसिकता पाहून मला फार वाईट वाटतं. एआर रहमान एक दिग्गज आहे आणि तो माझ्या वडिलांसारखा आहे. माझ्या आयुष्यात अनेक आदर्श आणि जे वडिलांच्या स्थानी आहेत, ज्यांनी माझ्या करिअरमध्ये आणि संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा : अमिताभ बच्चन यांना कसा वाटला अभिषेकचा I Want To Talk? रिव्ह्यू शेअर करत म्हणाले, 'गरजेनुसार...'
दरम्यान, सगळ्यात मोहिनी डेनं मीडियाशी प्रायव्हसी ठेवण्यास सांगितलं आहे. त्याविषयी लिहत मोहिनी डे म्हणाली, 'मीडिया/ पापाराझींना हे कळत नाही की या सगळ्याचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो आणि ज्यांच्याविषयी आहे त्यांच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होणार. त्यामुळे भान बाळगा. मला कोणाला काही स्पष्टीकरण द्यायचं नाही. पण त्यासोबत मला हे देखील नकोय की हे सगळं पाहून माझा दिवस खराब जातो. त्यामुळे कृपया खोटे आरोप करू नका आणि आमची प्रायव्हसीचा आदर करा.'