एकासोबत घटस्फोट नंतर दुसरं लग्न त्याआधी बॉबी देओलशी ब्रेकअप, प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा
Naleem Kothari Bobby Deol: नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपवर त्याकाळी विविध अफवाही पसरल्या होत्या. त्याबद्दल खुद्द नीलम कोठारेनं खुलासा केला आहे.
Naleem Kothari Bobby Deol: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा होताना दिसते. अनेकदा रिलेशनशिपमध्ये असताना ते एकत्र स्पॉट होतात तर ब्रेकअप झाल्यावर मात्र त्यांची चांगलीच चर्चा व्हायला लागते. 90 च्या दशकात अनेक लोकप्रिय सिनेमे आले ज्यांची सगळीकडेच जोरदार चर्चा झाली होती. त्याचसोबत तेव्हा कलाकारांच्या रिलेशनशिप्सचही प्रचंड जोरात चर्चा झाली होती. त्यात माधुरीपासून अक्षय कुमारपर्यंत सगळ्यांच्याच अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. त्यात एक नावं होतं ते म्हणजे नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांचे. तरूणाई म्हटलं की, त्यांच्यात फ्रेंडशिप, रिलेशनशिप ही असतेच. त्यामुळे प्रेमात पडणं, तो क्षण एन्जॉय करणंही ओघानं आलंच. नीलम आणि बॉबी देओलची चांगलीच चर्चा रंगली होती.
परंतु त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि मग ते वेगळे झाले. आज नीलम आणि बॉबी देओल हे वेगळे असले तरीसुद्धा त्यांच्या आजही चर्चा होताना दिसते. आपल्या आयुष्यात ते दोघंही पुढे गेले आहेत. त्याचसोबत करिअरच्या मानानंही त्यांनी वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या आहेत. बॉबी देओल आता ओटीटीवर आपलं नशीब आजमावतो आहे. त्यामुळे त्याचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. परंतु एका मुलाखतीतून नीलम कोठारी हिनं बॉबी देओलसोबत झालेल्या आपल्या ब्रेकअपमध्ये खुलासा केला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली.
स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ''हो, मी बॉबीच्या अखंड प्रेमात बुडालेले होते आणि मग आम्ही वेगळे झालो. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही पण माझ्याविषयी अनेक गैरसमजही आहेत. सोबतच अनेकजणं नको त्या अफवा पसरवत असतात. त्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये अशी माझी इच्छा आहे. त्यातील एक म्हणजे पूजा भट्ट माझ्या आणि बॉबी देओलच्या ब्रेकअपला जबाबदार होती. कोणामुळे आम्ही दोघं वेगळे झालो नाही तर आम्ही परस्पर संमतीनं हा निर्णय घेतला होता. मला जाणवलं की आम्ही दोघं एकत्र सुखी राहणार नाही. जे समजण्यासाठी मला 5 वर्षांचा कालावधी जावा लागला.'' असं ती म्हणाली होती.
हेही वाचा - 'स्वदेस'मधील मराठमोळी अभिनेत्री आठवतेय? श्रीमंत व्यक्तीशी करून आज जगतेय असं आयुष्य...
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे ते बराच काळ चर्चेत राहिले होते. एका हिंदी वृत्तपत्रानं नीलम आणि बॉबीच्या ब्रेकअपबद्दल वृत जाहीर केले आहे. सध्या त्याची बरीच चर्चा आहे. नीलमनं 'फॅब्यूलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाईफ्स' या ओटीटी सिरिजमधून डिजिटल माध्यमावर पदार्पण केले आहे.