मुंबई : गान कोकिळा लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत त्यांची आठवण करून त्यांचे चाहते त्याच्याशी संबंधित जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लता मंगेशकर एका मुलासोबत दिसत आहेत. लता मंगेशकर यांच्यासोबत हा लहान मुलगा कोण आहे हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत एक लहान मुलगा दिसत आहे. जो बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. पण वाईट बातमी म्हणजे हा अभिनेता आता आपल्यात नाही. या मुलाने जगाचा निरोप घेतल्याची बातमी ऐकून लता मंगेशकर यांनी हा फोटो शेअर केला होता. फोटोत दिसलेल्या या मुलाबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा आमचा स्पेशल रिपोर्ट.


फोटोमध्ये दिसत असणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसुन, प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार ऋषी कपूर आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी ऋषी कपूर यांच्या निधनाने लता मंगेशकर पूर्णपणे तुटल्या. ऋषी कपूर हे लता मंगेशकर यांचे खूप लाडके होते. त्यांचाही दीदींवर खूप जीव होता. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांनी त्यांची आठवण करून देत हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, मी पूर्णपणे शब्दहीन आहे. काही दिवसांपूर्वी ऋषी यांनी मला त्यांचा आणि माझा हा फोटो पाठवला होता. ते सगळे दिवस, सगळ्या गोष्टी आठवतायेत. मी शब्दहीन झाले आहे.



यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, मला काय बोलावं, काय लिहावं हे समजत नाही… ऋषीजींच्या निधनाने मला खूप दुःख झालं आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. हे दु:ख सहन करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.