मुंबई : भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच एक तिचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेमकं व्हिडिओत तीने काय केलंय ते जाणून घ्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नम्रता (Namrata Malla Video) दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही खूप मजेदार आणि मनोरंजक आहेत. अलीकडेच तिने पुन्हा एकदा तिच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची चाहते दिवाने झाले आहेत.  


व्हिडिओत काय?
नम्रता मल्लाने (Namrata Malla) पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ही सुंदर अभिनेत्री पिवळ्या रंगाचा घागरा आणि लाल रंगाची चोळी परीधान करून भन्नाट डान्स करताना दिसत आहे. नम्रता तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या लाल घागरा या गाण्यावर डान्स करत आहे. या गाण्यावर डान्स करताना नम्रताने तिचे केस मोकळे सोडले होते आणि कपाळावर पिवळ्या रंगाची टिकली लावली आहे. तसेच तिने अधिक सुंदर दिसण्यासाठी कमीत कमी मेकअप केला आहे.



नम्रता मल्ला (Namrata Malla Video)  स्वतःचे नृत्य कोरिओग्राफ करते आणि स्वतः डान्स स्टेप्स करते. नम्रता आणि तिची टीम अनेक आऊटडोअर शो आणि परफॉर्मन्ससाठी डान्स कोरिओग्राफी करतात. कधी कधी नम्रता स्वतः या शोसाठी ड्रेस आणि कॉस्च्युम डिझाइन करते. 


नम्रताच्या (Namrata Malla) या व्हिडिओला अवघ्या अर्ध्या तासात 1000 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या भोजपुरी अभिनेत्रीच्या व्हिडीओखाली चाहते जोरदार कमेंट करत आहेत.