महेश बाबूसोबत लग्न करण्याआधी नम्रता शिरोडकरनं बंगल्यात नाही तर अपार्टमेंटमध्ये राहण्याची ठेवली होती अट! जाणून घ्या कारण
Namrata Shirodkar Mahesh Babu Love Story : नम्रता शिरोडकरनं महेश बाबूशी लग्न करण्याआधी का ठेवली होती `अशी` अट?
Namrata Shirodkar Mahesh Babu Love Story : अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं तेलगू सुपरस्टार महेश बाबूशी लग्न केलं. त्याच्याशी लग्न केल्यानंतर नम्रतानं अभिनयापासून स्वत: ला लांब केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून सितारा असं तिचं नाव आहे आणि ती चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करते. पण तुम्हाला माहित आहे का की नम्रता आणि महेश बाबू जवळपास 5 वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी लग्न केलं. पण लग्नाआधी महेश बाबूसमोर नम्रता शिरोडकरनं एक अट ठेवली होती. याविषयी स्वत: नम्रतानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
नम्रता शिरोडकरनं 'प्रेमा' नावाच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं सांगितलं की तिनं महेश बाबूला सांगितलं होतं की ती आधी त्याच्यासोबत हैदराबादमध्ये अपार्टमेंटमध्ये राहणार. त्यानंतर ती बंगल्यात शिफ्ट होणार.
नम्रतानं सांगितलं की 'आम्ही खूप क्लियर होतो की लग्नानंतर आम्ही सगळ्यात आधी एका अपार्टमेंटमध्ये राहणार कारण मी मुंबईतली आहे आणि मला माहित नव्हतं की मी या आलिशान बंगल्यांमध्ये कशी राहणार. मला भीती वाटायची. त्यामुळे तो माझ्यासोबत एका अपार्टमेंटमध्ये राहू लागला. माझी अट होती की जर मी हैदराबादमध्ये येईन तर एका अपार्टमेंटमध्ये राहिन.'
नम्रता शिरोडकरनं सांगितलं की महेश बाबूशी लग्नानंतर तिचं संपूर्ण आयुष्य हे बदललं. लग्नाचा तिला खूप चांगला अनुभव मिळाला आहे. लग्नानंतर नम्रतानं अभिनय आणि चित्रपटांना रामराम केला. ती पूर्णवेळ तिच्या कुटुंबाला देण्यात बिझी झाली. नम्रता आणि महेश बाबू हे दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या मुलांचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांच्या मुलाचा जन्म 2006 मध्ये झाला तर लेकीचा जन्म हा 2012 मध्ये झाला होता.
हेही वाचा : 'श्रीदेवी आणि जूही चावला L.S आहेत'; नम्रता शिरोडकरचं 'ते' चॅट व्हायरल झाल्याने खळबळ
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नम्रता शिरोडकरचं चॅट व्हायरल झालं होतं. यात नम्रतानं श्रीदेवी आणि जुही चावला यांना L.S अर्थात 'लो सोसायटीच्या' म्हटलं होतं. तिचे हे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. रेडिटवर तिचे हे चॅट चांगलेच व्हायरल झाले आहेत.