'श्रीदेवी आणि जूही चावला L.S आहेत'; नम्रता शिरोडकरचं 'ते' चॅट व्हायरल झाल्याने खळबळ

Namrata Shirodkar Sridevi and Juhi Chawla : नम्रता शिरोडकरचं श्रीदेवी आणि जुही चावलाविषयीचे 'ते' चॅट व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Sep 27, 2024, 04:31 PM IST
'श्रीदेवी आणि जूही चावला L.S आहेत'; नम्रता शिरोडकरचं 'ते' चॅट व्हायरल झाल्याने खळबळ title=
(Photo Credit : Social Media)

Namrata Shirodkar Sridevi and Juhi Chawla : सोशल मीडिया ही एक अशी जागा आहे जिथे आताचे नंतरचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहतो. अनेक मुलाखती आणि व्हिडीओ क्लिप्स या प्रचंड व्हायरल होत असतात. त्यातील अनेक मुलाखती किंवा व्हिडीओ हे नेटकऱ्यांना आवडतात तर काहींमुळे नव्या वादाला सुरुवात होते. असा काहीसा वाद हा अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या एका जुन्या चॅटशोमधील व्हिडीओमुळे झाला आहे. नम्रता शिरोडकरनं एकदा श्रीदेवी आणि जूही चावला यांच्याविषयी वक्तव्य करत 'लो सोसायटीच्या' म्हटलं होतं.'

नम्रता शिरोडकरनं ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वी सांगितली होती. आता तिचा एक चॅट शो व्हायरल झाला आहे. रेडिटवर असलेल्या या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे आणि त्याला पाहून नेटकरी नम्रता शिरोडकवर वक्तव्य करत आहेत. नेमकं काय घडलं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया... 2000 मध्ये नम्रता शिरोडकरनं 'पुकार' या चित्रपटात काम केलं होतं. तेव्हा ती 'रेडिफ'च्या एका चॅट सेशनचा भाग झाली होती. त्यावेळी नम्रताला विचारण्यात आलं की ती श्रीदेवी, जूही चावला आणि माधुरी दीक्षितविषयी काय विचार करते याविषयी देखील सांगितलं. 

Namrata Shirodkar: "Juhi Chawla & Sridevi are Low Society"
byu/DebateAware9899 inBollyBlindsNGossip

नम्रता यावेळी बोलताना म्हणाली की श्रीदेवी आणि जूही चावला यांना 'लो सोसायटी' म्हटलं. तिनं म्हटलं की 'निश्चितपणे, मी स्वत: साठी एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जिथे जूही आणि श्रीदेवी यांचा प्रश्न आहे, तर त्या पूर्णपणे एल.एस. आहेत. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की त्याचा अर्थ काय आहे, तर त्याचा अर्थ लो सोसायटी असा आहे.'

हेही वाचा : 'असे लोक...', सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडकडून सोनू निगमवर अत्याचार आणि फसवणूकीचे आरोप!

नम्रता शिरोडकरनं 1977 मध्ये 'शिरडी के साई बाबा' या चित्रपटातून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली.त्यानंतर तिनं 1998 मध्ये अभिनेत्री म्हणून 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटातून कामाला सुरुवात केली. ते 'मेरे दो अनमोल रतन', 'कच्चे धागे', 'वास्तव: द रियलिटी', 'हेरा फेरी', 'अलबेला', 'वामसी' 'एलओसी कारगिल' आणि 'मेजर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तर नम्रतानं दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूशी लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत.