बाप-लेकीची भूमिका साकारणारे Nana Patekar, Manisha Koirala एकेकाळी रिलेशनशिपमध्ये, `या` कारणामुळे झालं ब्रेकअप
Nana Patekar यांच्यात आणि मनीषा कोईराला यांच्यात असं काय झालं की त्यांना अखेर ब्रेकअप करावं लागले... जाणून घ्या काय आहे कारण
Nana Patekar and Manisha Koirala Relationship Why They Broke Up : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारल्या आहेत. नाना पाटेकर हे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायचे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नाना पाटेकर एकेकाळी बॉलिवूडमधील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत ( Manisha Koirala) रिलेशनशिपमध्ये होते.
नाना पाटेकर आणि मनीषा या दोघांची पहिली भेट ही 1996 साली 'खामोशी: द म्यूजिकल' (Khamoshi: The Musical) या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटा दरम्यानच ते जवळही आले. या चित्रपटात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी बाप-लेकीची भूमिका साकारली होती. त्यानंतर नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला या दोघांनी अग्निसाक्षी या चित्रपटात काम केले होते.
यावेळी नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला रिलेशनशिपची सतत चर्चा सुरु असायची आणि इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना याविषयी माहित होते. इतकंच काय तर नाना पाटेकर हे सतत मनीषा कोईरालाच्या घरी जायचे असे देखील एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांचे रिलेशनशिप हे जास्त काळ राहिले नाही.
हेही वाचा : Shatrughan Sinha यांच्या मुलाकडून बॉलिवूडची पोलखोल!
नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांचं रिलेशनशिप तुटण्यामागे कारण, नाना पाटेकर हे विवाहित होते आणि त्यांना पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. तर दुसरीकडे मनीषा कोईराला सतत नाना पाटेकर यांना लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. यामुळे नाना पाटेकर आणि मनीषात वाद सुरु झाले आणि त्यांचं ब्रेकअप झाले. त्यानंतर मनीषानं नेपाळी बिझनेसमन सम्राट दहलसोबत लग्न केले. पण मनीषाचं हे लग्न काही काळचं टिकले आणि त्यानंतर तिनं पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.
मनीषाा कोईराला यांच्या लोकप्रियतेेत आजही कमी नाही. तर त्यांचे आजही लाखो चाहते आहेत. मनीषा या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. दरम्यान, नाना पाटेकर यांना काही दिवसांपूर्वीच तडका हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत दृश्यम फेम श्रेया सरन, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि अली फजल यांच्या भूमिका आहेत. त्यांचा हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.