जेव्हा विवाहित Nana Patekar पडले होते Manisha Koirala च्या प्रेमात; एका अभिनेत्रीशी वाढत्या जवळिकीमुळे अधुरी राहिली love story
Manisha Koirala Birthday : आज अभिनेत्री मनीषा कोईराला तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 12 अफेयर! ब्रेकअप, घटस्फोटानंतरही आज ही अभिनेत्री एकटी आहे. एकेकाळी विवाहित नाना पाटेकरसोबत तिचं नाव जोडल्या गेलं होतं. फार क्विचतच ही लव्ह स्टोरी कोणाला माहितीय.
Manisha Koirala Birthday : बहुचर्चित वेब सिरीज हीरामंडीमुळे मनीषा कोईराला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिच्या आयुष्यातील अनेक घटना या चाहत्यांसमोर उघड झाल्यात. मीनाक्षाचं आयुष्य अनेक संघर्षमय राहिलं. प्रेमात विश्वासघात, ब्रेकअप, लग्न आणि नंतर घटस्फोट एवढंच नाही तर कॅन्सरशी दोन हात करुन ती आज खंबीरपणे उभी आहे. नाना पाटेकरपासून ऑस्ट्रेलियन राजदूतापर्यंत तिचं नाव अनेकांशी जोडल्या गेलं पण आजही ती अविवाहित तर आहेत आणि एकटीपण. हो नाना पाटेकरसोबत तीच अफेयर होतं अशी चर्चा होती.
नाना पाटेकर हे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील एक असे अभिनेते आहेत, ज्यांच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करतात . आपल्या अनोख्या डायलॉग डिलिव्हरीमुळे त्याने 90 च्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या अभिनयाप्रमाणेच लव्ह लाईफचीही खूप चर्चा झाली. मनीषा कोईरालासोबतचे त्यांचे अफेअर त्या काळात सर्वाधिक गाजले कारण तेव्हा नाना पाटेकर विवाहित होते.
नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची प्रेमकहाणी
ही प्रेम कहाणी सुरु झाली 1996 मधील 'अग्नी साक्षी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान... नाना पाटेकर नेपाळी ब्युटी मनीषा कोईरालाच्या प्रेमात पडले होते. त्याचवेळी मनीषाचे अभिनेता विवेक मुशरनसोबत ब्रेकअप झालं होतं. ती ब्रेकअपच्या वेदनेतून जात असतानाही नानांकडे आकर्षित झाली आणि त्याच्या प्रेमात पडली. अशा परिस्थितीत दोघांनीही चित्रपटादरम्यान एकमेकांना गुपचूप डेट करायला सुरुवात असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं.
'अग्नी साक्षी' मध्ये एकत्र काम केल्यानंतर नाना आणि मनीषा त्याच वर्षी (1996) प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या 'खामोशी' चित्रपटातून दिसून आलेत. तोपर्यंत त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि प्रेमाची बातमी संपूर्ण इंडस्ट्रीत वाऱ्यासारखी पसरली होती.
पण या अभिनेत्रीमुळे झाला त्यांचा ब्रेकअप
नाना आणि मनीषा दोघेही त्यांच्या रागीट स्वभावासाठी ओळखले जातात. ते अनेक प्रसंगी भांडतानाही दिसून आले आहेत. असे म्हणतात की, नाना मनीषाचा बाबतीत खूप पझेसिव्ह होते. त्यामुळे तिचे कपडे, तिच्या सहकलाकारांशी जवळीक यासारख्या मुद्द्यांवर ते आक्षेप घ्यायचे. अशा परिस्थितीत दोघांमधील वाद इतका वाढला होता की ते एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते. हा तो काळ होता जेव्हा मनीषाला नाना यांच्यासोबतच्या नात्याचं भविष्य दिसत नव्हतं.
नाना त्यावेळी विवाहित होते आणि ते दोन मुलांचे वडील देखील होते. मात्र ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते. मात्र, पत्नीपासून विभक्त झाल्यानंतरही ते मनीषासोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकले नाहीत.
एवढंच नाही तर ज्यावेळी मनीषाने नाना पाटेकर आणि अभिनेत्री आयेशा जुल्का यांना एका बंद खोलीत पाहिले, तिथे नात्याला तडा गेला. तेव्हा मनीषा आयेशावर ओरडली आणि म्हणाली, माझ्या माणसापासून दूर जा...आयशाही त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि मनीषाचे हे शब्द तिच्यासाठी बाणासारखे ठरले. मात्र, याचा नानांवर काहीही परिणाम झाला नाही आणि त्यांनी कधीही मनीषासोबतचे नाते सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. अशा परिस्थितीत मनीषाने नानांना सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
मनीषासोबतच्या ब्रेकअपचा नानांवर फारसा परिणाम झाला नाही किंवा आपण असे म्हणू शकतो की त्यांनी ते कधीच कळू दिले नाही. पण एका मुलाखतीत त्यांनी मनीषाबद्दल आठवण काढली होती. ते म्हणाले होते की. 'ती एक अतिशय संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी मृगासारखी आहे, तिला अजूनही हे समजले पाहिजे की तिला कोणाशीही जुळवून घेण्याची गरज नाही. तिच्याकडे सर्व काही आहे आणि ते पुरेसे आहे. मी क्वचितच माझ्या अश्रूंना थांबू शकतो.'
हेसुद्धा वाचा - 12 अफेयर! ब्रेकअप, घटस्फोट, 53 वर्षीय अभिनेत्रीच्या अयशस्वी प्रेमाच्या वेदना; म्हणाली - 'मी चुकीच्या पुरुषांसोबत...'
ब्रेकअपनंतर मनीषाने नेपाळी उद्योगपती सम्राट दहलशी लग्न
नाना यांच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर, मनीषाने डीजे व्हॉसन, क्रिस्पिन कॉनरॉय, सेसिल अँथनी यांसारख्या अनेकांना डेट केलं आणि त्यानंतर 2010 मध्ये, तिने नेपाळी व्यावसायिक सम्राट दहलशी लग्न केलं आणि ती स्थायिक झाली. मात्र त्यांनी अवघ्या दोन वर्षांत घटस्फोट घेतला. दुसरीकडे नाना आणि आयेशा जुल्का एकत्र राहू लागले आणि त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केलं.