पटना : गेल्या काही दिवसांपासून बरेचे नेते आणि कलाकार दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या घरी पोहोचत आहेत. 14 जून रोजी सुशांतने आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर बॉलीवूडसह अनेकांना धक्का बसला आहे. त्यातच अभिनेता नाना पाटेकर हे देखील सुशांतच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पटना येथील सुशांतच्या घरी पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर लष्कराच्या जवानांचं उत्साह वाढवण्यासाठी बिहारमधील पटना येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावर पोहोचले होते. यावेळी नाना आर्मी ड्रेसमध्ये दिसले. या व्यतिरिक्त त्यांनी मोकामाजवळील खेड्यात नांगरही चालविला होता आणि अनेक चाहत्यांची भेट घेतली. त्यानंतर नाना पाटेकर हे राजीव नगर येथील सुशांतच्या गावी पोहोचले आणि सुशांतच्या निधनावर दुःख व्यक्त केलं.



सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही राजीव नगरमध्ये असलेल्या सुशांतच्या घरी पोहोचली होती. यावेळी ती खूप भावनिक दिसत होती. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव हे देखील सुशांतच्या घरी पोहोचले होते. भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी देखील सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं होतं. याशिवाय अभिनेते मनोज तिवारी, अभिनेता पवन सिंह, अभिनेता खेसारीलाल यादव, अभिनेता राकेश मिश्रा, गायक-अभिनेता अक्षरा सिंह यांनीही सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली.