Nana Patekar On Bollywood Nepotism: सध्या नाना पाटेकर यांची चर्चा आहे. आता ते आगामी चित्रपटातून दिसणार आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सिन वॉरमध्ये ते दिसणार आहेत. मागच्या वर्षी विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली होती. आता त्यांचा आगामी द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या निमित्तानं काल या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाना पाटेकर, पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. यावेळी नाना पाटेकरांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आपलं मतं मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडच्या घराणेशाहीवर अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली असते. नेपोटिझम हे अनेकदा बॉलिवूडमध्ये दिसते अशीही चर्चा रंगलेली असते. त्यात आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही यावर वाच्यता फोडली आहे. खरंतर विवेक अग्निहोत्रीही अनेकदा त्यावर चर्चा करताना दिसतात. 


यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, 'आता मी अभिनेता आहे. उद्या मला माझ्या मुलानं अभिनेता व्हावं असं वाटतं. अशावेळी समोरच्याची कुवत असो वा नसो, प्रेक्षकांवर असा कलाकारांचे सिनेमे हे लादले जातात. एक चित्रपट जर का चालला नाही तर दुसरा बनवला जातो. दोन्ही नाही तर आणखीनं दहा बनवले जातात. मग कालांतरानं अशा कलाकारांना प्रेक्षक स्विकारू लागतात. असे दहा चित्रपट बनवल्यानंतर हे कलाकारही आपल्या डोक्यावर बसतात. यांचे अतिशय वाईट चित्रपट प्रेक्षकांना पाहावे लागतात.' 


ते पुढे म्हणाले की, आता व्हॅक्सिन वॉरसारखा चित्रपट हा प्रदर्शित होतो आहे. तेव्हा यातील तुम्हालाही फरक कळेलच. सध्या त्यांच्या या वक्तव्याची चांगली चर्चा रंगलेली आहे. सध्या वेलकम 3 वरही नाना पाटेकर बोलले आहेत. यावेळी या चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये ते दिसणार नाहीत. त्यावरही त्यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. पूर्वीच्या काळी समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांमध्ये जो फरक होता तो आता राहिलेला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येक चित्रपटांना एक नवीन व्यासपीठ मिळालं आहे. सध्या समांतर चित्रपटाची अवस्था वाईट आहे, समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांतील फरकाबद्दलही ते स्पष्टच बोलले. The Vaccine War मध्ये जवानमध्ये झळकलेली अभिनेत्री गिरिजा ओखही दिसणार आहे.