पुणे : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळावेत असं वाटतं, पण आपण समजून घ्यायला हरकत नाही, कारण स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले, तर त्या पुरस्कारांचं महत्व कमी होत नाही, मला देखील आतापर्यंत तीन राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले आहेत. राष्ट्रपतींचा कार्यक्रम व्यस्त असेल, आणि ते काम त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्याकडे सोपवलं असेल, तर त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात गैर काय आहे, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जात असल्याने, त्यावर काही पुरस्कार विजेत्यांनी आक्षेप घेत आपण पुरस्कार स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली, मात्र यानंतर जवळ जवळ सर्वच लोकांनी पुरस्कार स्वीकारण्याची सहमती दर्शवली.