मुंबई : उर्दूतील कथालेखक सआदत हसन मंटो यांच्यावरील चरित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण जरी पूर्ण झाले असले तरी  मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाची दिग्दर्शक आणि अभिनेत्री नंदिता दास हीने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मामि' चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध दिग्दर्शिका नंदिता दासने ही माहिती दिली. "चित्रपटाच्या चित्रीकरणावर तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नाचे उत्तर दिग्दर्शकाला देणे प्रचंड कठीण असते. आमच्या चित्रपटाचे चित्रीकरण जरी पूर्ण झाले असले तरी पोस्ट प्रोडक्शनमध्ये अनेक बदल होत आहेत. आम्ही सध्या त्यावरच काम करत आहोत. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित व्हायला २०१८ उजाडेल," असे नंदिताने सांगितले. 


नवाजुद्दिन सिद्दिकी या चरित्रपटात सआदत हसन मंटोची भूमिका करणार आहे तर अभिनेत्री रसिका दुग्गल मंटोच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. ७० व्या 'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या बहुचर्चित चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते.