मुंबई : समाजात असलेल्या असमानतेवर अभिनेत्री नंदिता दास ही कायम अग्रेसर असते. सुंदर दिसण्यासाठी महिलांवर आणि पुरूषांवर कायमच दबाव टाकला जातो. गोरं असणं हे अत्यंत महत्वाचं असल्याचं कायमच समाजाकडून प्रत्येकाचा मनावर बिंबवल जातं. या सगळ्यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ नंदिताने शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदिता 2013 पासून 'डार्क इज ब्युटिफुल' नावाचं अभियान राबवत आहे. अभियानाचा हेतू असा की, गोऱ्या आणि काळ्या रंगावरून समाजात महिला आणि पुरूषांमध्ये होणारा भेदभाव. गोरा रंगच महत्वाचा काळ्या रंगाला कायमच दुय्यम स्थान दिलं जातं. नंदिता अगदी सुरूवातीपासून याच गोष्टीवर जोर देत आली आहे की, समाजाताली सर्व रंगांना समान हक्क दिला पाहिजे आणि याच विषयावर भाष्य करणारं हे दोन मिनिटांच ऍथम लाँच केलं आहे. 



'इंडिया गॉट कलर' असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात अली फझल, राधिका आपटे, कोंकणा सेन शर्मा, गुल पनाग, दिव्या दत्ता, तनिष्ठा चॅटर्जी, तिलोत्तमा शोम, सयानी गुप्ता आणि सुचित्रा पिल्लई यांसोबत अनेक कलाकार या व्हिडिओत आहेत. 


'डार्क इज ब्युटिफुल' हे अभियान दुसऱ्या व्यक्तीने सुरू केलं होतं. पण मी आता याचं समर्थन करते. या अभियानाला दहा वर्षे पूर्ण झाली पण अजूनही ही परिस्थिती बदलली नाही. आजही महिलांवर सुंदर दिसण्यासाठी दबाव टाकला जातो. सुंदर दिसण्यापेक्षा महिला अधिक बुद्धीमान असतात, या गोष्टीचा लोकांना विसर पडतो, असं नंदिता दास सांगते.