मुंबई : रणबीर कपूरसोबत 'रॉकस्टार' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच भुरळ घातली होती. रणबीरसोबत या चित्रपटातून नर्गिस फाखरी या अभिनेत्रीनं स्क्रीन शेअर केली होती. रणबीर आणि नर्गिसच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची चांगलीच पसंतीही मिळाली होती. पण, त्यानंतर मात्र ती बॉलिवूडमधील कारकिर्दीमध्ये फारशी कमाल करु शकली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ती चर्चेत आली आहे ते म्हणजे संघर्षाच्या दिवसांतील काही प्रसंगांवर उघडपणे वक्तव्य केल्यामुळे. नर्गिसला बॉलिवूड चित्रपटांमध्ये संधी मिळाली नाही, असं नाही. पण, तिनं काही लोकांच्या 'त्या' मागण्या पूर्ण न केल्यामुळे अनेक चित्रपट तिला गमवावे लागले.


हल्लीच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितल्यानुसार चित्रपटांच्या दुनियेत तिनं काही गोष्टींचा निर्धार करतच पाऊल ठेवलं होतं. 'मी प्रसिद्धीसाठी आसुसलेले नव्हते. काम आणि प्रसिद्धीझोतासाठी मी न्यूड पोझ देऊ शकत नव्हते, दिग्दर्शकासोबत वेळ घालवू शकत नव्हते. किंबहुना मी अनेकांच्या अशाच मागण्या पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे अनेक चित्रपट मला गमवावे लागले', असं नर्गिस म्हणाली.


बॉलिवूडमध्ये येण्यामागेही होतं कारण
हिंदी चित्रपटांमध्ये अॅडल्ट सीन नसतात या विचारानं तिनं या चित्रपट विश्वात पाऊल ठेवलं होतं. यासंदर्भात सांगताना ती म्हणाली, 'मॉडेलिंगमध्ये अनेकदा तुम्हाला टॉपलेस फोटोशूट करण्यास सांगितलं जातं, किंवा न्यूड सीन करण्यास सांगितलं जातं. माला या साऱ्यामध्ये संकोच वाटत होता.' अशाच एका मोठ्या मासिकाच्या फोटोशूटची ऑफर नर्गिसला मिळाली होती. पण, तिथं अॅडल्ट फोटोशूट होणार असल्यामुळे तिनं ही ऑफर नाकारली होती.




प्रियकरासोबत खास क्षणांचा आनंद घेतेय नर्गिस
सध्या चित्रपट दुनियेच्या संपूर्ण झगमगाटापासून दूर नर्गिस तिचा प्रियकर जस्टिन संटोस याच्यासोबत खास क्षणांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. जस्टिन आणि नर्गिस सहसा अनेक ठिकाणांना भेट देताना दिसतात. त्यांच्या या प्रवासाचे फोटोही ते चाहत्यांच्या भेटीला आणत असतात.