मुंबई : देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित सिनेमा येत आहे. फिल्ममेकर विवेक अग्नीहोत्री यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. 


३३ वर्षांनी दोन दिग्गज एकत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन चक्रवर्ती आणि नसीरूद्दीन शाह यांनी आत्तापर्यंत पाच वेळा एकत्र काम केलं आहे. आता तब्बल ३३ वर्षांनी ते पुन्हा स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात दोघेही एकत्र बघायला मिळणार आहेत. या सिनेमाचं टायटल ‘द ताशकंद फाईल्स’ असं असणार आहे. 


अग्नीहोत्री यांनी सांगितले की, ‘दिग्गज कलाकारांसोबत विश्वसाने काम करणे हे स्वतंत्र भारताच्या सर्वात मोठ्या रहस्यावर तयार होत असलेल्या सिनेमावर काम करत असताना गरजेचं आहे’.


त्यांनी ट्विट करून दिली माहिती


आपले दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा ताशकंदमध्ये रहस्यमयी मृत्यू झाला होता. काय त्यांना जहर दिलं गेलं होतं?, अशी चर्चाही तेव्हा रंगली होती. ५२ वर्षांनंतर स्वतंत्र भारतात गुप्त ठेवली गेलेल्या या बाबीची माहिती नागरिकांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना दिली गेली नाही. अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर मी ‘द ताशकंद फाईल्स’घेऊन येण्यास सज्ज आहे’.


हृदयविकाराचा झटका?


दिग्दर्शका लाल बहादुर शास्त्री यांच्या भूमिकेसाठी एका प्रसिद्ध कलाकाराची निवड करणार आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाईल. सिनेमाचं शुटिंग पुढील आठवड्यात सुरू होईल. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर शांती करारावर सही केल्यानंतर ताशकंदमध्ये त्यांचा कथित हृदयविकाराच्या झटक्याने मॄत्यू झाला होता.